साप्ताहिक शिक्षक ध्येय सोमवार दिनांक ८ जानेवारी २०२४
संपादकीय...
आनंदाने आयुष्य जगा...
भारत एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला नेहमी सकारात्मक विचार प्रवृत्त करत असतात. सकारात्मक विचारांमुळेच आपल्यामध्ये उत्साह निर्माण होतो. उत्साहाच्या बळावर आपण एकटेच अशक्य वाटणारे कार्य सुध्दा करु शकतो.
कधीही हार न मानता पुढे चालत राहणे म्हणजेच आयुष्य होय. कधी निराश, उदास, हताश न होता समोरील आयुष्य आनंदाने, सुखाने व्यतीत करीत राहणे हाच आयुष्याचा नियम आहे. आनंदाने आयुष्य जगा, प्रत्येक क्षणाचा, दिवसांचा पुरेपूर आनंद घ्या.
आपल्याला जीवनात प्रगती करायची असेल तर इतरांवर अवलंबून राहू नका. किती दिवस इतरांचे सहकार्य, मदत, मार्गदर्शन घेऊन आपले आयुष्य व्यतीत कराल. झेप घ्यायची असेल तर दोन पावले मागे जाऊन स्वत:च्या हिंमतीवर उंच झेप घ्या अगदी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे.. कारण इतरांचे सहकार्य, मदत, मार्गदर्शन या सर्व गोष्टी बोनस असतात, हक्क नाही...
लक्षात ठेवा.. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका..
संपूर्ण साप्ताहिक अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
Comments
Post a Comment