साप्ताहिक शिक्षक ध्येय 25 डिसेंबर 2023

 


साप्ताहिक शिक्षक ध्येय 25 डिसेंबर 2023 

संपादकीय...

 

 

आनंद...

जीवन म्हणजे तीन पानाचे एक पुस्तक असतं पहिलं आणि शेवटचं पान देवाने लिहिलेलं असतं. पहिलं पान म्हणजे जन्म शेवटच पान म्हणजे मृत्यू उरलेले मधले पान मात्र आपल्याला भरायचे असते!"

परमेश्वराने या सृष्टीची निर्मिती करताना सर्व काही गोष्टी विचारपूर्वक केलेल्या आहेत. प्रत्येक सजीवाची वैशिष्ट्ये त्याची शरीरचना बौद्धिक क्षमता या सर्वांचे नियोजनबद्ध व्यवस्था परमेश्वराने लावली आहे. लाभलेला देह हा आपल्यासाठी वरदानच आहे. प्रत्येक देहाला एक कालावधी नेमून दिलेला आहे या कालावधीमध्ये पृथ्वीतलावर कार्य त्याला साधायचे आहे. सर्व प्राण्यांच्या तुलनेने अप्रतिम बुद्धी, प्रचंड सामर्थ्य, भावना व्यक्त करण्यासाठी लाभलेली भाषा या सर्वांचा विचार करता मनुष्य प्राणी हा सर्व प्राण्यांवर आपले अधिराज्य गाजवत आहे.

मनुष्याला लाभलेला हा जन्म; या जन्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला तर जीवनातील आपला जन्म हा नेमका कशासाठी आहे? हे त्याला समजेल व अर्थहीन जीवनापासून तो दूर जाऊ शकेल.

आपल्या प्रत्येक कृतीमध्ये निस्वार्थ वृत्तीने केलेल्या कार्यातून अंतकरणात सात्विक आनंद प्राप्त होतो. केवळ भौतिक गरजा मध्ये आपण आनंद शोधत बसलो तर संपूर्ण आयुष्यच आनंद शोधण्यातच खर्च होते. म्हणूनच जे आपल्याला ज्या पद्धतीने; ज्या स्वरूपात प्राप्त झाले त्यामध्येच आनंद शोधला पाहिजे.

मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होतो हा पूर्व पुण्याईवर याचा विचार करण्यापेक्षा मिळालेला जन्म यात मला नेमके काय कार्य साधायचे आहे? यावर विचार होणे महत्त्वाचे आहे.

निसर्गातील प्रत्येक घटक प्रत्यक्ष निसर्ग कधीच थांबत नाही, वेळ कधी थांबत नाही, काळ कधी थांबत नाही. मग आपण का थांबावे?

साप्ताहिक शिक्षक ध्येय 25 डिसेंबर 2023 अंक वाचण्यासाठी .. 

इथे क्लिक करा .. CLICK HERE

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग