साप्ताहिक शिक्षक ध्येय, सोमवार दिनांक १८ सप्टेंबर २०२३ : वर्ष ४ थे अंक २३ वा.
संपादकीय...
असा साजरा करा गणेशोत्सव...
आज... काळ बदलला, माणसं
बदलली. नवीन तंत्रज्ञान आले. गणपती बाप्पा मोठे मोठे होत गेले अन् माणुसकी आटत
गेली. आजही घरोघर गणपती बसवतात... पण आरतीला फक्त चार पाच डोके..
मोठे मोठे गणेश मंडळ आस्तित्वात आले.
छोट्या बाप्पाची जागा १० - १५ फुटी गणपतीच्या मूर्तीने घेतली. टाळ, घंटी जाऊन बँजो, डीजे आले. मध्यंतरी 'एक गाव एक गणपती' ची संकल्पना पुढे आली
होती.. ती जाऊन आज गल्लोगली गणेश मंडळाचा सुळसुळाट झाला.जबरदस्तीने वर्गणी गोळा
करून प्रत्येक चौकाचौकात, गल्लोगली गणेशोत्सव साजरा व्हायला लागला.
माझाच गणपती मोठा या चढा ओढीत मात्र माणुसकी, आपलेपणा, प्रेम,
आदर, संस्कार अचानक नाहीसे झाले.
दहा दिवस जागरण, गोंधळ
अन् आरतीच्या नावाखाली बऱ्याच ठिकाणी खंडणी प्रमाणे वर्गणी उकळली जाते. अक्षरशः
लोकांना लुटले जाते. बळजबरी केली जाते. जमा रकमेतून पुढे दहा दिवसाच्या
कार्यक्रमासाठी जागरण, गोंधळ सुरु असतो.. पहाटे पर्यंत...
समाजाकडून या प्रवृत्तीला नकळत
प्रोत्साहन दिले जाते अन् या अशा वृत्तीमुळे गणेशोत्सवाचा मूळ हेतूच दुर्लक्षित
होतो. पुढे प्रश्न पडतो गणेशोत्सव असावा की नसावा?
प्रश्न जरी भक्तीचा असला तरी त्याचं अवडंबर
का करतोय आपण?
गणेशोत्सव मंडळांनी गावा गावात स्वच्छता मोहीम राबवावी, रक्तदान शिबिरे आयोजित करावे, गरीब
गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा वर्षभराचा शैक्षणिक खर्च करावा, एखाद्या अनाथ आश्रम किंवा वृध्दाश्रमाला भेट देऊन, गोड
धोड जेवण देऊन, त्यांचा गणेशोत्सव देखील आनंदात जाण्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे.
गरिबाला मदत करून, भुकेल्याला अन्नदान करून, प्रेमाने, आपुलकीने मोठ्या व्यक्तींचा आदर ठेवत, कोणालाही त्रास न होता, माणुसकी जपत हा उत्सव एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने का नाही साजरा करत आपण?
साप्ताहिक शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय. २० एप्रिल २०२० रोजी शुभारंभ.
राज्यातील १००+ शिक्षकांतर्फे प्रकाशित. पालक, विद्यार्थी व शिक्षकांसाठी एकमेव हक्काचे व्यासपीठ.
वर्षभरातील राज्यस्तरीय स्पर्धा: कर्तृत्ववान शिक्षक, कर्तृत्ववान महिला, बालचित्रकार पुरस्कार.
महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, वेस्ट बंगाल, बिहार, पंजाब,
गोवा आणि दिल्ली येथे वाचले जाणारे डिजिटल साप्ताहिक. वाचकवर्ग ३ लाख+:
साप्ताहिक अंक वाचण्यासाठी .. CLICK HERE
येथे क्लिक करा किंवा येथे क्लिक करा
Visit today
https://chat.whatsapp.com/GtSl1hZyVFk8qdz25ocGMJ