बुधवारी करावे रक्षाबंधन साजरे: पं. डाॅ श्री. प्रसादशास्त्री कुळकर्णी
येवला जिल्हा नाशिक=
यावर्षी रक्षाबंधन सणाबाबत लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झाला आहे, तोच संभ्रम दूर करण्याबाबत पंचांग अभ्यासक पं.डाॅ श्री प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी सांगितले की,३०ऑगस्ट बुधवारी रक्षाबंधन साजरी करावी. या वर्षीची नारळीपौर्णिमा ३० आणि ३१ऑगस्ट या दोन दिवशी येत आहे. त्यामुळे रक्षाबंधन नेमक्या कोणत्या दिवशी साजरे करावे याबाबत संभ्रम आहे . रक्षाबंधन हा सण दरवर्षी शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहिण भावाच्या प्रेमाच्या नात्याचा पवित्र सण म्हणून रक्षाबंधन ओळखले जाते.रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर संरक्षक धागा बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. मात्र यावेळी बहुतेक जणांच्या मनात याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, नेमके रक्षाबंधन कधी साजरे करायचे?वास्तविक यावेळी पौर्णिमा तिथी (रक्षाबंधन २०२३ तारीख) ३० आणि ३१ या दोन दिवशी येत आहे. त्यामुळे कोणत्या दिवशी राखी बांधली जाईल हे लोकांना समजत नाही.
अधिक श्रावणामुळे यंदा सर्वच सणांच्या तारखांचा गोंधळ सुरु आहे. परिणामी रक्षाबंधन सुद्धा ३० की ३१ ऑगस्टला आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय.
श्रावण पौर्णिमा तिथी ही मुळात ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०: ५८ वाजता सुरू होते आणि ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७:०५ वाजता समाप्त होते. यामुळेच रक्षाबंधनाच्या तारखांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. बुधवारी रक्षाबंधन साजरे करावे आणि बहिणीने ३० ऑगस्ट बुधवारी दिवसभरात केव्हाही भावाला राखी बांधून हा सण आनंदाने साजरा करावा. यज्ञविधान करून राखी (रक्षासूत्र)बांधले तरच भद्रा बाबत नियम पाळावे लागतात. हल्ली आपण राखी बांधून सण साजरा करतो ;त्यामुळे भद्रा काळ बघण्याची गरज नाही;असे पं.डाॅ श्री प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
व्हिडिओ बघा..
https://youtu.be/bh9gfLvad4E?si=GDQOedyj29f4gBW5
रक्षाबंधन विशेषांक वाचण्यासाठी ..