Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय 15 ऑगस्ट 2023

 


संपादकीय...

 

 

आज आत्मपरीक्षण करण्याची गरज...  

आज आपण स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करतो आहोत. खरचं आपण स्वातंत्र्य आहोत का? आपला देश सुजलाम सुफलाम आहे का? आपणा सर्वांना अन्न, पाणी, निवारा, रस्ते, वीज, दवाखाने यादी जीवनावश्यक सुविधा मिळत आहे का? आपल्याला अपेक्षित असलेले स्वातंत्र्य म्हणजे बेरोजगारीपासून, गरीबीपासून, भ्रष्टाचारापासून, बेईमानीपासून गुन्हेगारीपासून, कुशासनापासून, महागाईपासून बरोबर पण इतकं सर्वसमावेशक स्वातंत्र्य हवं असेल तर वैयक्‍तिक स्तरावर प्रश्‍न विचारण्या पलिकडे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करतो का? हाही प्रतिप्रश्‍न स्वत:ला विचारला पाहिजे कारण निरीक्षण केले तर लक्षात येईल वरील प्रश्‍नांना सरकार, समाज याबरोबर प्रत्येक व्यक्‍तीही तितकाच जबाबदार असतो म्हणूनच त्याचे उत्तर शोधण्यातही एक व्यक्‍ती म्हणून सहभाग घेणे अगत्याचे ठरते.

          संवेदनशील माणूस होण्याच्या परीक्षेत आपण नापास होत आहोत. सदया शेतकरी सुरक्षित नाहीत अन् महिलाही सुरक्षित नाही. सहकाराचा स्वाहाकार होतो, शिक्षणाचा बाजार मांडला जातो, शिक्षणात गुणवत्ता दिसत नाही. पदवीचे कागद घेऊन युवक बाहेर पडताहेत, नोकरी नाही कारण कौशल्य नाही. रुग्णालये वाढतात पण रुग्ण कमी होत नाहीत. सरकार, पोलिस हा जनतेचा खरे तर मित्र आहे, पण गोर-गरिबांना, मध्यमवर्गीय साध्यासुध्या माणसांना, सज्जनांना पोलिसांचीच भीती वाटावी अशी परिस्थिति आहे. जिथे प्रामाणिकपणाला किंमत नाही. माणसाने जगणे हीच जिथे जन्मठेप वाटावी अशा व्यवस्थेला स्वातंत्र्य म्हणावे का?

          भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्ये दिली आहेत. किंबहुना अधिकार आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बर्‍याच वेळेला या कर्तव्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. सरकार कडून विविध नियम पाळण्याचे वारंवार आवाहन करून देखील आम्ही नियम पाळत आहोत काय? वाहतुकीचे नियम, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, मतदान करणे, राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण आपण करतो का? स्वतःच्या जगण्यामध्ये देशासाठी जगणं आम्ही विसरुन गेलो आहोत. त्यामुळेच अत्याचार, भ्रष्टाचार अशा विकृतींनी डोकं वर काढलं आहे.

          देश महासत्ता होण्यासाठी प्रत्येकानंच देशाच्या विकासाचं स्वप्न पाहावं पण त्याला कृतीची जोड हवी. कृती करण्याची व तितक्याच तत्परतेने कार्य करण्याची जिद्द आपल्यात हवी.

          या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची आज खरी गरज निर्माण झाली आहे.

संपूर्ण साप्ताहिक शिक्षक ध्येय अंक वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..

CLICK HERE  

Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५

  राज्यातील शिक्षकांसाठी   कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२५   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय ,   मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने   राज्यातील शिक्षकांसाठी ' कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा ' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.   पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २०, चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी ३८  विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गत पाच वर्षात राज्यातील एकूण २१५ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्...