HSC English: 6 गुण कोणाला मिळतील?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
आज बारावीचा पहिला इंग्रजी या विषयाचा पेपर झाला. मात्र पहिल्याच पेपरच्या प्रश्नपत्रिकेत त्रुटी आढळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मात्र या त्रुटीवर संयुक्त सभेच्या अहवालानुसार योग्य तो विद्यार्थ्यांना न्याय दिला जाईल असे स्पष्टीकरण शिक्षण मंडळाने दिले होते.
मंडळाची बैठक झाली, त्यानुसार बारावी इंग्रजीच्या प्रश्न पत्रिकेतील चुकांबाबत पुढील निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी poetry विभाग लिहून तीनपैकी कोणताही एक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केल्यास, किंवा त्रुटी असलेल्या प्रश्नांचे क्रमांक ए ३, ए ४, ए ५ यांपैकी काही उत्तरपत्रिकेत नमूद केल्यास किंवा कोणत्याही एका प्रश्नाचे लेखन उत्तर पत्रिकेत केल्यास, त्यांनाच सहा गुण देण्यात येतील, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
JOIN TODAY
https://chat.whatsapp.com/IcmTeHgRugkAjASYSv3cj9
व्हिडिओ पाहा...