संपादकीय...
मराठी: महाराष्ट्रीय माणसाचा मानबिंदू
भाषा हे केवळ संवादाचं माध्यम नसून ते संस्कृती आणि अस्मितेचं
प्रतीक आहे. आपली मराठी भाषा ही केवळ आपली राजभाषा नाही, तर आपलं
सांस्कृतिक वैभव आणि महाराष्ट्रीय माणसाचा मानबिंदू आहे. मराठी भाषेच्या विकासातच
या राज्याचा सर्वांगीण विकास सामवलेला आहे, त्यामुळे मराठी
भाषेचा विकास ही आपल्या सर्वांची जबाबदारी आणि सर्वाधिक प्राधान्याने करण्याची
गोष्ट आहे. भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषेचा चौथा
क्रमांक आणि जगात दहावा क्रमांक लागतो. वैभवशाली वारसा लाभलेली मराठी भाषा
विसाव्या शतकात अनेक प्रवाहांना आपल्यामध्ये सामावून घेत अधिक समृद्ध झाली आहे. २१
व्या शतकातील आधुनिकतेचा साज लेऊन अधिक व्यापक होत आहे.
साहित्यिकाची लेखणी समाजमनाचा आरसा असते. ती कधी मृदू ,कोमल तर कधी
परखड बनते. तिच्या शब्द लालित्याची जादू मनावर गारुड करते. आणि वाचक मंत्रमुग्ध
होऊन जातो आपसुकच त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात. वाह! किती सालंकृत रसाळ ही मायबोली!
आणि त्या रसाळ मधुर मायबोलीचा अमृतकुंभ टिपून घेण्यासाठी हृदयाचे पक्षी गगन भरारी
घेऊ लागतात.
अशा या रसाळ मायबोलीचा विकास व्हावा, सर्वजनामुखी तिची गोडी चाखली जावी हे मराठी माणसाला न वाटावे ते नवल!
सर्व वार्षिक वर्गणीदार यांना आजचा साप्ताहिक शिक्षक ध्येय अंक - मराठी भाषा दिन विशेषांक - वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे...
https://chat.whatsapp.com/IcmTeHgRugkAjASYSv3cj9
शिक्षक ध्येय प्रकाशन® रजि. नं. 2020600314621099
साप्ताहिक शिक्षक ध्येय
वार्षिक वर्गणी 500 रु.
वर्षभरात 52 डिजिटल अंक ॲपवर मिळतील.
(दर सोमवारी प्रकाशन)
शिक्षक ध्येय: एक शासन मान्यताप्राप्त मुक्त व्यासपीठ, सर्वांसाठी...
आजच वार्षिक वर्गणीदार व्हा...
सोबत फोन पे किंवा G पे द्वारे 9623237135 यावर 500/- रु भरुन याच नंबरवर स्क्रीन शॉट पाठवावा...
🔴 एक नि:पक्ष साप्ताहिक: कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा शैक्षणिक संघटनेशी आम्ही बांधील नाही
✍🏻 शिक्षक ध्येय: अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक - सर्वांसाठी एक मुक्त व्यासपीठ
एकदा भेट दयाच:
https://shikshakdhyey.in/madhukar_ghaydar-3/
नेटवर्क: 153 व्हॉट्सॲप ग्रुप, शिक्षक ध्येय ॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम - एकूण 1 लाख+ वाचक वर्ग
अंक वाचण्यासाठी....
संपादकीय मंडळ, महाराष्ट्र