बोर्डाची परीक्षा: यंदा विद्यार्थ्यांची कसोटी लागणार..
10 वी, 12 वीच्या यंदाच्या परीक्षेत हे दोन महत्त्वपूर्ण बदल
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना या वर्षी १०० टक्के अभ्यासक्रमासह बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार आहे आणि दुसरा बदल म्हणजे मागील वर्षी कोरोनामुळे विद्यार्थी ज्या शाळेत शिकत होता, त्याच शाळेत बोर्डाचे परीक्षा केंद्र होते. पण या वर्षी मात्र तसे नसणार. बोर्ड जे केंद्र देईल तिथे विद्यार्थ्यांना परीक्षेला जावे लागेल.
स्वगृही शाळा हेच केंद्र असल्याने आणि फक्त ७५ टक्के अभ्यासक्रम असल्याने मागील वर्षी बोर्डाचा निकाल ९९ टक्के लागला होता. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा व त्या सुलभ पार पडण्याच्या पद्धतीवर आक्षेपही घेण्यात आला होता. मात्र, यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांना निर्धारित केलेल्या केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे आणि दुसरे म्हणजे शंभर टक्के अभ्यासक्रमावर ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे यंदाची परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी कसोटी ठरणार आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनाही जोमाने तयारी करण्याचा सल्ला शिक्षक तसेच पालकांकडून दिला जात आहे.
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना.... CLICK HERE
दहावी बारावीच्या बोर्डाचे वेळापत्रक बघण्यासाठी...
शैक्षणिक माहितीसाठी...
https://chat.whatsapp.com/INf4POZVCuaKDtkdFRuOoy
शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय