Skip to main content

संजय पवार: राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक




संजय पवार राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानीत

नवी दिशा नवे उपक्रम या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

पुणे येथे रविवार दि.२२/१/२०२३ नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील निवडक ५० उपक्रमशील शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेणारे नवी दिशा नवे उपक्रम नावाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि या ५० शिक्षकांचा गुणगौरव सोहळा  नुकताच संपन्न झाला.
यावेळी माणगांव  तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होडगावचे शिक्षक संजय पवार यांना राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक म्हणून गौरविण्यात आले.
संपादक देवराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी माजी उपसंचालक विकास गरड, उपप्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर, विजय आवारे, याचबरोबर शिवाजी खांडेकर, सचिन डिंबळे, बाळकृष्ण चोरमले, सेवानिवृत्त शिक्षिका विजया महाडिक यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्र सेवादलाचे निळू फुले सभागृह साने गुरुजी स्मारक येथे सकाळी ११ते दूपारी ३ संपन्न झाले. यावेळी सर्वच मान्यवरांनी आपल्या भाषणातून या  पुस्तकातील उपक्रमांचे  कौतुक करत  महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात नवी देण्याचे काम केले असल्याचे व्यक्त केले.
या पुस्तकात रुक्साना युसूफ शेख इंदापूर, पुणे,  जे.डी.पाटील सिंधुदुर्ग, स्वाती पाटील सिंधुदुर्ग, बळीराम जाधव अहमदनगर, संतोष गवळी अहमदनगर, प्रदीप विघ्ने नागपूर, प्रमिला गावडे अहमदनगर, दिपाली  लोखंडे पुणे, ध्रुवास राठोड जळगाव , शंकर चौरे धुळे, लता गवळी अहमदनगर , किसन फटांगडे अहमदनगर, गितांजली माथनकर यवतमाळ, रफत इनामदार पुणे, नेहा गोखरे यवतमाळ, रोहिणी गायकवाड बीड, उज्वला फटांगरे पुणे, सोपान बंदावणे पुणे ,सदानंद कांबळे रत्नागिरी, आयुब शेख पुणे , वसुधा नाईक पुणे, सीमा बोजेवार यवतमाळ, चित्रा गोतमारे यवतमाळ,बापू चतुर नाशिक, सुप्रिया चोरघे पुणे ,वैशाली काळे पुणे, मीनल पाडावे ठाणे, सरला गावडे अहमदनगर, हर्षदा चोपणे यवतमाळ ,सतिश मुणगेकर रत्नागिरी, संजय पवार रायगड, सुहास दोरुगडे रत्नागिरी ,रूपाली पाटील रत्नागिरी ,शितल मदने पुणे, अनिता रहांगडाले भंडारा ,विजय वाघमोडे रत्नागिरी, संगीता म्हस्के पुणे ,लता साळवे औरंगाबाद ,करुणा गावंडे चंद्रपूर ,वैशाली पाटील पालघर, तिरूमला माने पुणे, हेमलता चव्हाण पुणे ,स्मिता पाबरेकर रायगड ,सुनिता निकम अहमदनगर,जया कुलथे अहमदनगर,  मीनाक्षी नागराळे वाशिम,बंडोपंत नजन पुणे, विजय माने पुणे,झुंबर कदम पुणे,वनिता मस्कर पुणे या ५० उपक्रमशील शिक्षकांच्या उपक्रमाचा समावेश या पुस्तकात आहे.मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन , राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आले..
वरील सर्व नवोपक्रमाचा महाराष्ट्रातील शिक्षक, विद्यार्थी यांना प्रेरणादायी व उपयुक्त ठरणार आहे. अतिशय मेहनत घेऊन सर्वांच्या समन्वयातून अफलातून निर्मिती करण्यात आलेली आहे.आजच्या या सोहळ्याला महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांतील शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. देवराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आल्या बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

शिक्षक ध्येय: शिक्षकांचे एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय व्यासपीठ



https://shikshakdhyey.in


Popular posts from this blog

आज मोबाईलवर पहा दहावीचा निकाल..

  आज मोबाईलवर पहा १० वीचा निकाल .. ‘या’ 4 वेबसाईट्सवर बघता येईल 10 वीचा निकाल  आज दुपारी एक वाजता ... क्लीक करा... खालील कोणत्याही एका लिंकवर... https://sscresult.mkcl.org https://sscresult.mahahsscboard.in https://results.digilocker.gov.in https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th प्रचलित शिक्षण पद्धतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी.. https://shikshakdhyey.co.in/?p=599 आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२५

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी (१४ नोव्हेंबर रोजी) निकाल   शिक्षक ध्येय आणि प्रायोजक 1, प्रायोजक 2, प्रायोजक 3, प्रायोजक 4 पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२५ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात...