शिक्षक ध्येयच्या एकूण 153 अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप आहेत.
आजपासून या सर्व 153 ग्रुपचे कम्युनिटी ग्रुपमध्ये रुपांतर करीत आहोत...
WhatsApp introduces Communities feature
व्हाट्सअॅपची घोषणा: सर्वांना उपयोगी कम्युनिटी फीचर लाँच
जाणून घ्या: कम्युनिटी म्हणजे काय?
_व्हॉट्सॲपने आता WhatsApp Communities उपलब्ध करून देण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त ५१ ग्रुप्स एकत्र करून एक कम्युनिटी बनवू शकता. या कम्युनिटीचा वापर अनेक ग्रुप एकत्र करून त्यांचं नियंत्रण करणं यासाठी होऊ शकेल. शाळा, परिसर, कामाच्या ठिकाणी ही सोय उपयोगी पडेल. ग्रुप्समध्ये आणि कम्युनिटीमध्ये मेसेज जाहीर करण्यासाठी वापर करता येईल._
_इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने त्याच्या लाखो वापरकर्त्यांसाठी अनुभव अधिक सुधारण्यासाठी कम्यूनिटीज फीचर आणले आहे. या फीचरद्वारे, 1024 सदस्य एका ग्रुपमध्ये जोडले जाऊ शकतात या नव्या फीचरची घोषणा खुद्द मार्क झुकरबर्गने सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे._
_सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, 'आज आम्ही व्हॉट्सॲपचे कम्युनिटी फीचर लॉन्च करत आहोत._ _यामुळे तुमचा अनुभव आणखी चांगला होईल._
_ॲडमिनला ग्रुप मॅनेज करणे सोपे जाईल._
_फीचरचा उद्देश ग्रुप चॅट पूर्वीपेक्षा अधिक चांगला करणे हा आहे. फीचरच्या मदतीने ग्रुप Admin ला ग्रुप मॅनेज करण्यात खूप मदत होईल. तसेच, याद्वारे तुम्ही एका ग्रुपमध्ये वेगवेगळे ग्रुप add करू शकता. यासाठी मुख्य ग्रुपद्वारे जोडल्या जाणार्या ग्रुप किंवा व्यक्तीला आमंत्रण पाठवावे लागेल._ _आमंत्रण प्राप्त करणार्या व्यक्तीने किंवा ग्रुपने आमंत्रण स्वीकारल्यास, तो किंवा ती ग्रुप मध्ये सामील होईल. या फीचरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते वेगवेगळ्या गरजांनुसार व्यवस्थापित केले जाऊ शकते._
_अँड्रॉइड आणि आयओएस फोन वापरकर्ते व्हॉट्सअपचे हे नवीन फीचर वापरू शकतात. या फीचरच्या माध्यमातून नवीन ग्रुप बनवता येतो तसेच जुना ग्रुप वाढवता येतो. तसेच, अडमिन ग्रुपच्या सर्व सदस्यांना आवश्यक अपडेट्स किंवा माहिती एकाच वेळी देऊ शकतो._
_व्हॉट्सअप आपली सेवा एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह सुरू ठेवेल. या नवीन फीचरद्वारे, विशिष्ट ग्रुपमध्ये समाविष्ट असलेले लोकच त्या ग्रुपचे मेसेज पाहू शकतील. त्यासाठी आपणास 153 ग्रुप पैकी एका ग्रुप ला जॉईन व्हावे लागेल_
शिक्षक ध्येय च्या कम्युनिटी ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...