आयटीआय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

 



आयटीआय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 


आता दरमहा 40 रुपयांऐवजी 500 रुपये विद्यावेतन मिळणार


मागील 40 वर्षापासून मिळत आहे दरमहा 40 रुपये विद्यावेतन 


ITI Student Stipend: तब्बल 41 वर्षांनी आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा स्टायपेन म्हणजे विद्यावेतनात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 1982 पासून हे विद्यावेतन आज पर्यंत फक्त 40 रुपयेच होते.

राज्यातील शासकीय आयटीआय संस्थेतील विद्यार्थ्यांना आता 500 रुपये विद्यावेतन मिळणार आहे  येत्या तीन महिन्यात विद्यावेतन लागू करण्यात येईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील हजारो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. शासकीय आयटीआय संस्थांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा विद्यावेतनात आता घसघसीत वाढ होणार आहे. 

संबंधित प्रस्ताव हा मंत्रीमंडळासमोर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली. 


आयटीआय कोर्सेसमध्ये बदल होणार


आयटीआयमधील कोर्सेस हे कालबाह्य झाले असून नवीन कोर्सेस बाबत सरकार पुढील वर्षी घोषणा करणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. राज्यातील 36 जिल्ह्यासाठी एक कमिटी स्थापन केली असून प्रत्येक जिल्ह्यात ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी आवश्यक असणारे कोर्स घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. 

राज्यात सद्यस्थितीत जवळपास सव्वा लाख विद्यार्थी आयटीआयमधून शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना आता 500 रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे.

नोकरीच्या जाहिरातीसाठी जॉईन व्हा..

https://chat.whatsapp.com/Ls5EEaJKGP857zblZXyCIB

शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय 

https://shikshakdhyey.in














Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग