सरकारकडून शिक्षकांना खास नाताळ गिफ्ट
शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात भरघोस वाढ: राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात १२ वर्षांनंतर मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना सरकारकडून खास नाताळ गिफ्ट मिळाले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तयार केलेला मानधन वाढीचा प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे मंजुरीसाठी आहे. या मंजुरीनंतर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात येईल.
प्राथमिक शिक्षकांना 15 हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना 18 हजार आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना 20 हजार रुपये असे मानधन करण्यात येणार आहे. इतकी मोठी वाढ आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याची मागणी होत होती.
शैक्षणिक माहितीसाठी आमच्या ग्रुपला जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/EjtLZBehRvGDi8PdANGKGg
शिक्षक ध्येय शिक्षकांचे एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय व्यासपीठ
Comments
Post a Comment