मंडणगड पॅटर्नची राज्यात अंमलबावणी

 



मंडणगड पॅटर्नची राज्यात अंमलबावणी


विद्यार्थ्यांना मिळणार महाविद्यालयातूनच जात पडताळणी प्रमाणपत्र 


विद्यार्थी बारावी नंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, अग्री., आदी इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्रांची आवश्‍यकता असते. तो पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतो, पण त्याच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने बऱ्याच वेळा प्रवेश मिळणे अवघड होते.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जात पडताळणी समितीतर्फे विद्यार्थांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मंडणगड पॅटर्न नुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.


असा आहे मंडणगड पॅटर्न? मंडणगड (जि. रत्नागिरी) येथे जात पडताळणीची सर्व प्रक्रिया महाविद्यालयात केली जाते.  येथेच विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्विकारले जातात. समन्वयक समितीतील अधिकारी त्यातील त्रुटी जागेवरच दूर करून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करतात. महाविद्यालयातच तपासणी होत असल्याने त्यातून विद्यार्थ्यांचा वेळ व खर्चामध्ये बचत होत आहे. तसेच पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचा अगोदरच त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे.


असे मिळवा जात पडताळणी प्रमाणपत्र:


विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज 

 १)     CLICK HERE 


  2)    CLICK HERE 


या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरुन त्याची हार्ड कॉपी प्रिंट संबंधित लागणाऱ्या कागदपत्रांसह आपल्या महाविद्यालयात सादर करावीत. संबंधित महाविद्यालय ते सर्व जमा प्रस्ताव दिनांक १ ते ३१ डिसेंबर या काळात जिल्हा समितीकडे सादर करेल.

अशा रीतीने विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेपूर्वीच मिळू शकेल..




शैक्षणिक माहितीसाठी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा...


विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय 

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग