जि. प. नाशिक: सुपर 50 उपक्रम

 



जि. प. नाशिक: सुपर 50 उपक्रम

SUPER 50 NASHIK

जिल्हा परिषद नाशिक

आयोजित  'सुपर ५०' उपक्रम

जाणून घ्या नेमका काय आहे हा उपक्रम..

नाशिक जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद नाशिक कडून 'सुपर ५०' उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये अनुसूचित जाती / जमाती या प्रवर्गातील सन २०२२-२३ मध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील अनुदानित, अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळेतील प्रवेशीत विद्यार्थ्यांकरीता निवासी स्वरुपात नियमित अभ्यासक्रमाबरोबर सीईटी, जेईई  (CET/JEE) या पात्रता परीक्षेकरीता ५० विद्यार्थ्यांची परीक्षेद्वारे निवड करण्यात येऊन या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यातून यासाठी एक पात्रता परीक्षा घेण्यात येणार असून यामधील ५० विद्यार्थ्यांची निवड ही 'सुपर ५०' उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. यासाठीच्या पूर्व परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे त्याचसोबत विहित नमुन्यात विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाकडे देखील दि. ०४/११/२०२२ नोंदणी करता येणार आहे.
विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी अटी -
१) सदर योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणारा विद्यार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील व सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इ. ११ वी विज्ञान शाखेत अनुदानित, अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा, जि. नाशिक येथे प्रवेशीत असावा.

२) सदर योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता १० वी मध्ये किमान ६५ % गुण प्राप्त झालेले असावेत.

३) सदर योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असणारा विद्यार्थ्यास दोन वर्षासाठी प्रशिक्षण व सर्व अध्यापन निवासी शाळेत निशुल्क असेल. त्याकरिता विद्यार्थ्याची व पालकांची तयारी/संमती आवश्यक राहील.

४) सदर योजनेचा लाभ देण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना निवड चाचणी परीक्षा अनिवार्य राहील तसेच सदर निवड चाचणी परीक्षेत मेरिट नुसार उच्चतम् गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड मर्यादित स्वरुपात करण्यात येईल.
या उपक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता परीक्षेत जिल्ह्यातील २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इ.११ वी विज्ञान शाखेत अनुदानित, अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये,आश्रमशाळा, जि. नाशिक येथे प्रवेशित अनुसूचित जाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, सदर चाचणी परीक्षा मोफत असून महाविद्यालयांनी या संदर्भात सर्व माहिती विद्यार्थ्यांना द्यावी निर्देश शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी केले आहे.

  ★★★

        ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने "सुपर ५०" हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे, ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत तज्ञ प्रशिक्षकांकडून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे मी आवाहन करते.

~~ आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

ऑनलाईन नोंदणीसाठी गुगल फॉर्मची लिंकसाठी खाली क्लिक करा....

1.    CLICK HERE

2.    CLICK HERE

3.      CLICK HERE




जॉईन व्हा...

https://chat.whatsapp.com/HOOlCKUkOLMC4hxFDRcNeA



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग