भीम ॲप कसे वापरावे?

 



BHIM APP कुठून आणि कसे डाऊनलोड करावे व कसे वापरावे?

भीम ॲप म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनची निर्मिती "नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया" या भारत सरकारच्या आर्थिक देवाण घेवाण प्रणाली विकसित व देखभाल करणाऱ्या संस्थेने केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'भीमराव' या नावावरून या ॲपला भीम हे नाव देण्यात आले आहे.

BHIM अँपद्वारे, आपण काही मिनिटांत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतो. जर तुम्ही BHIM app वापरत असाल आणि तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत ते इतर कोणतेही UPI अँप वापरत असतील तरीही तुम्ही त्यांना सहज पैसे पाठवू शकता, त्यासाठी तुम्हाला फक्त त्या व्यक्तीचा UPI आयडी टाकावा लागेल.

असे वापरा भीम ऍप?

प्रथम आपल्याला खालील लिंक क्लिक करून

https://play.google.com/store/apps/details?id=in.org.npci.upiapp किंवा प्ले-स्टोअर ओपन करून BHIM APP हे नाव सर्च करायचे आहे आणि डाउनलोड करून घ्यायचे आहे

BHIM APP चालू कसे करावे?

पहिले आपल्याला BHIM APP ओपन करायचे आहे. आता आपल्याला भाषा सिलेक्ट करायची आहे भाषा सिलेक्ट केल्यानंतर पुढचे पेज ओपन होईल नंतर PROCEED असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे आणि परमिशन द्यायचे आहे.

आता आपल्याला बॅंकेची लिंक असलेला नंबर निवडायचा आहे तर त्यासाठी आपल्याला SIM1, SIM2 असे दिसेल जर आपला बॅंकेची लिंक असेलला सिम एक मध्ये असेल तर SIM1 निवडायचे आहे सिम सिलेक्ट केल्यानंतर PROCEED वर क्लिक करायचे आहे

आपला नंबर Verify होईल आता आपल्याला Register Passcode मागेल. तर आपल्या लक्षात राहील असा REGISTER PASSCODE दोन वेळा टाकायचा आहे नंतर Successful होईल

आता आपल्याला मोबाईल नंबर ची लिंक असलेली बॅंक निवडायची आहे बॅंक सिलेक्ट केल्यानंतर Next वर क्लिक करायचे आहे आता आपल्याला अकाउंट नंबर व IFSC CODE दिसेल. 

वापरायचे कसे?

आता आपल्याला सर्विसेस दिसतील Bill Pay म्हणजे आपण सर्व प्रकारचे बिल भरू शकतो. तिथे आपल्याला Send Money असे ऑप्शन दिसेल तिथून आपण कोणाला Bank Account वरून पैसे पाठवू शकतो. तिथे आपल्याला SCAN असे ऑप्शन दिसेल. आपण बारकोड स्कॅन करून पैसे पाठवू शकतो. खालील Profile असे नाव दिसेल त्यावर क्लिक केल्यास आपला बारकोड व UPI I'd दिसेल.


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग