हिंदुस्तान, हिंदू धर्म, हिंदुत्व...
देशात सध्या विचित्र पद्धतीचे कोलाहल माजले आहे. हिंदुस्तान, हिंदू धर्म, हिंदुत्व हे शब्द जरी उच्चारले तरी काहींच्या मस्तकाचा पारा चढतो. मग अशा वेळी विचार येतो आपण नेमके राहतो कुठे ? आपली मातृभूमी, कर्मभूमी कोणती आहे ? भारत, इंडिया कि हिंदुस्तान ? आज हा प्रश्न पडण्यामागचे कारण म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती . . देशप्रेम म्हणजेच हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व या विचारांवर ठाम असणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण केले की आजच्या देशातील परिस्थितीबद्दल विलक्षण चीड येते. सावरकरांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व जर प्रत्येक नागरिकांच्या मनात स्वातंत्र्यानंतर रुजवले गेले असते तर आज देशाचे चित्र वेगळे असते.
जन्मजात देशभक्त, स्वदेशीचा पुरस्कर्ता, प्रखर क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ, तर्कसिद्ध हिंदुत्वाचे भाष्यकार, थोर संघटक, आग्रही आणि सक्रीय समाजसुधारक, गतकाळातील घटनांचे संकलन करून स्फूर्तिदायक ग्रंथ लिहिणारे इतिहासकार, नवनवीन शब्द देणारा भाषाशास्त्रज्ञ, द्रष्टा राजकारणी, ओजस्वी वक्ता आणि प्रतिभाशाली साहित्यिक, अशा अनेकविध गुणांच्या माध्यमातून आपले संपूर्ण जीवन केवळ देश, मातृभूमी आणि स्वातंत्र्य यांसाठी झोकून देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या साहित्यातून सर्वसमावेशक हिंदुत्वाची संकल्पना मांडली.
अंक वाचण्यासाठी...