राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2022
मुदतवाढ करण्यात आली आहे
भारत सरकारच्या वतीने दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त अध्यापनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदा या पुरस्कारासाठी ऑनलाइन नोंदणी उद्यापासून सुरु होत आहे. नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०२२ आहे. यावर्षी देशातील १५४ शिक्षकांचा शिक्षकदिनी गौरव केला जाणार आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यामागील भूमिका अशी आहे की, देशातील काही उत्कृष्ट शिक्षकांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचा गौरव करणं आणि आनंद साजरा करणे, या भूमिकेतून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. शिक्षकांचा कार्याचा उचित सन्मान करणे हा देखील यामागील उद्देश आहे. ज्या शिक्षकांनी त्यांच्या कामाप्रती वचनबद्धतेमुळे शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासोबत विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध केले आहे, अशा शिक्षकांप्रती कृतज्ञता या पुरस्काराच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. शिक्षकांना १ जून ते ३० जून दरम्यान नामांकन अर्ज सादर करता येणार आहे.
केवळ नियमित शिक्षक व शाळा प्रमुख पात्र असतील, कंत्राटी शिक्षक, तासिका शिक्षक, शिक्षक मित्र यासाठी पात्र नाहीत.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची निवड प्रथम जिल्हास्तरावर करण्यात येते. त्यानंतर राज्यपातळीवर निवड केली जाऊन राज्यातून आलेल्या शिफारसीनुसार देश पातळीवर शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाते.
©सकाळ
शिक्षकांनी १ जून ते ३० जून २०२२ दरम्यान आपला नामांकन अर्ज सादर करावा.
पुरस्काराबाबत अधिक माहिती वाचा...
CLICK HERE
पुरस्कारासाठी नोंदणी करण्यासाठी लिंक:..
CLICK HERE