आता मिळवा व्हाट्सऍपवर ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड
डिजी लॉकरची सर्व कागदपत्रे व्हाट्सऍपवर उपलब्ध: कागदपत्रे हवी तेव्हा, हवी तिथे...
फक्त एका मॅसेज द्वारे सर्व कागदपत्रे व्हाट्सऍपवर आपल्या मोबाईल मध्ये...
100 millian नागरिकांनी डिजिलॉकर साठी नोंदणी केलेली आहे.
सरकारने डिजिलॉकर सर्व्हीस व्हाट्सऍप वर उपलब्ध करून दिली आहे.
म्हणजेच तुम्ही फक्त एका नंबरवर मेसेज पाठवून पॅनकार्ड किंवा सर्व कागदपत्रे व्हाट्सऍप मध्ये डाउनलोड करू शकता.
आपणाकडे डिजिलॉकर असेल तर त्यातील सर्व कागदपत्रे व्हाट्सऍपवर मिळतील.
खालील कागदपत्रे:
नागरिकत्व, शैक्षणिक आणि आर्थिक स्वरूपाची कागदपत्रे जसे एसएससी व एचएससी मार्कशीट, पदवी प्रमाणपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड, कोविड लसीकरण प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले इत्यादी* आपण व्हाट्सऍप वर मिळवू शकतो.
व्हाट्सऍपवर असे करा डाउनलोड...
1. तुम्हाला फक्त +91 9013151515 या नंबरवर Hi, Namaste किंवा Digilocker हा व्हाट्स ऍप मेसेज करायचा आहे.बस्स...
डिजिलॉकर खाते असल्यास फक्त आपला आधार नंबर टाकून, आलेला OTP टाकून आपण ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड इ. लगेच मिळवू शकतो. तात्पर्य डिजिलॉकर मध्ये तुम्ही आधीच अपलोड केलेली सर्व कागदपत्रे तुम्ही आता व्हाट्सऍपवरून डाउनलोड करु शकता..
2 मिनिटांत मिळवू शकता..