तुमच्या आधारकार्डवर किती लोकांनी सिमकार्ड खरेदी केलेले आहेत? लगेच चेक करा... फक्त एका मिनिटात...
सद्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगार नवनवीन पद्धतींचा वापर करून फसवणूक करत आहेत. अनेकदा तुमच्या आधारकार्डचा वापर चुकीच्या कामासाठी देखील होऊ शकतो. तसेच तुमच्या आधारकार्डचा वापर करून नवीन सिम कार्ड देखील विकत घेऊ शकतात. आधारकार्ड सहज एडिट करता येते किंवा झेरॉक्स सहज उपलब्ध होते कारण आपण अनेक ठिकाणी आधारकार्डची झेरॉक्स देतो.
बऱ्याचदा आपण एकच सिमकार्ड विविध मोबाईल सिम कंपन्यांसोबत पोर्ट करतो. तर अनेकदा कुटुंबातील एका सदस्याच्या आधार कार्डद्वारे कुटुंबातील इतर व्यक्ती सिम कार्ड घेतात.
असे करा चेक?
तुमच्या आधार कार्डवर जारी करण्यात आलेले सिम कार्ड्स तपासण्यासाठी सर्वात आधी ही संपूर्ण पोस्ट वाचून घ्या आणि मग...
CLICK HERE
येथे क्लिक करावे लागेल.
येथे तुमचा मोबाइल नंबर टाकून ओटीपीसाठी विनंती करावी लागेल. त्यानंतर तुमच्या नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आपल्या आधार कार्डवर रजिस्टर्ड असलेले सर्व मोबाइल नंबर तुम्हाला येथे दिसतील.
जर यातील एखादा नंबर तुमचा नसल्यास तो ताबडतोब बंद करा, बंद करण्यासाठी तुम्हाला त्या नंबरच्या पुढे टिक मार्क करुन खालील रिपोर्टवर क्लिक करावे लागेल.
_(टीप : यात आपले आधारकार्ड व मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे)_
प्रश्न: एका आधारकार्डवर किती सिमकार्ड खरेदी करता येतात?
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आधार कार्डावर जास्तीत जास्त 18 सिम कार्ड काढता येतात.
Comments
Post a Comment