तुमचं बँक खाते आणि आधार लिंक आहे का? चेक करा...
घरबसल्या मोबाईलवर चेक करा... फक्त एका मिनिटात...
बॅक खाते आधार कार्डशी लिंक न केल्यास खाते बंद केले जातील, असे सरकारने जाहीर केल्यानंतर अनेकांनी बॅंकेच्या शाखेत जावून आधार कार्ड लिंक केले असेल. पण तुमचे खाते खरंच आधार कार्डशी लिंक झाले की नाही? हे आता घरबसल्या असे चेक करा....
तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका. सिक्युरिटी कोड टाकून सबमिट केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लिंकिंग स्टेटस दिसेल.
एकाच आधार नंबरशी लिंक केलेले अनेक खाती असू शकतात. मात्र तुम्ही शेवटचं लिंक केलेलं खातं यामध्ये दाखवलं जाईल. तुम्हाला तुमच्या सर्व खात्यांची माहिती पाहिजे असेल, तर बँकेत जावं लागेल.
तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आधार नंबर लिंक करावाच लागणार आहे.
Comments
Post a Comment