आदिवासी विकास विभाग
एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षा
(CBSE इंग्रजी माध्यम)
पात्रता: इयत्ता 6 वी, 7 वी, 8 वी आणि 9 वीत शिकत असलेला (ST) विद्यार्थी/विद्यार्थिनी
परीक्षा दिनांक 5 जून 2022
एकलव्य परीक्षा 5 जूनला
कळवण प्रकल्प जिल्हा नाशिक: एकलव्य स्पर्धा परीक्षा नियोजन
एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलसाठी इयत्ता ६ वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षा रविवार ता. ५ जूनला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.
आदिवासी विभागाच्या एकलव्य निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी इयत्ता ६ वी तसेच रिक्त जागांवर इयत्ता ७ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. सद्या, या वर्षी इयत्ता ५ वी, ६ वी व ८ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित/ आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा तालुका निहाय घेण्यात येणार आहे.
सुरगाणा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा शासकीय आश्रमशाळा सराड येथे व कळवण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय आश्रमशाळा कनाशी येथे तसेच सटाणा व मालेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय आश्रमशाळा पांढरुण येथे आयोजित केली आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन कळवणचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
शासकीय पत्र पाहण्यासाठी...
परीक्षा प्रक्रियेबाबत संपूर्ण वेळापत्रक, परीक्षेचे स्वरूप, पात्रता, अभ्यासक्रम, 17 एकलव्य शाळांची यादी, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, इयत्ता निहाय रिक्त जागांचा अनुशेष, विद्यार्थ्यांनी जमा करावयाचे आवेदनपत्र, संपूर्ण तपशील, अंतिम गुणवत्ता यादी कधी जाहीर होणार? प्रवेश घेण्याचा अंतिम दिनांक किती? प्रश्नपत्रिकाचे स्वरूप, परीक्षेसाठी पात्रता व निकष, संबंधित प्रकल्प कार्यालयाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आदी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर करा...
Comments
Post a Comment