आयटीआयचे तीन विषयांचे एकत्रीकरण

 


आयटीआयचे तीन विषयांचे एकत्रीकरण

इडी, डब्लूसीएस आणि थेरीची एकच १०० गुणांची परीक्षा


मुंबई: देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील तीन विषयांचे एकत्रीकरण करून यापुढे एकच पेपर घेतला जाणार आहे, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक दि. अं. दळवी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

     औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील फिटर, टर्नर, मशिनिष्ठ, वेल्डर या सारख्या इंजिनिअरिंग ट्रेड मधील प्रशिक्षणार्थी सद्या इंजिनिअरिंग ड्रॉईंग (इडी), वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स (डब्लूसीएस) आणि ट्रेड थेरी असे तीन वेगवेगळे विषय शिकतो. या तिन्ही विषयांची परीक्षा देखील वेगवेगळी घेतली जाते. ज्यात इडी चा पेपर ५० गुणांचा, डब्लूसीएसचा पेपर ५० गुणांचा आणि ट्रेड थेरीचा पेपर १०० गुणांचा घेतला जातो. या वर्षांपासून तिनही विषयांची एकत्रित १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. 

यंदा २०२१-२२ मध्ये ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे, त्यांना हा नियम लागू होणार आहे. 

मात्र यापूर्वी इडी, डब्लूसीएस आणि  थेरी या विषयांतील अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थीसाठी जुन्याच पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. देशभरातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या सर्वांना हा निर्णय लागू राहील असे पत्रकात नमूद केले आहे.

*महत्त्वाचे

सद्या इडीचा पेपर ५० गुणांचा, डब्लूसीएसचा पेपर ५० गुणांचा, ट्रेड थेरीचा पेपर १०० गुणांचा आणि निदेशक अंतर्गत सत्र गुण इडीसाठी २० गुण, डब्लूसीएससाठी १० गुण, ट्रेड थेरीसाठी २० गुण असा एकूण २५० गुणांसाठी हे तीन विषय होते.

 हे तिन्ही विषय एकत्र करून १०० गुणांचे करण्यात आले आहे. ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी चालू सत्रासाठी प्रवेश घेतला आहे त्यांना जुलै/ऑगस्ट २०२२ मध्ये इडी व डब्लूसीएससाठी स्वतंत्रपणे पेपर देण्याची आवश्यकता नाही.

शासकीय पत्र वाचण्यासाठी... CLICK HERE

बातमी वाचण्यासाठी...CLICK HERE



Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग