Skip to main content

राज्यातील ४६ महिलांना 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार' जाहीर

 


 

मातृसेवा फाउंडेशन ठाणे, स्माईल टीम यवतमाळ आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांचा अनोखा उपक्रम

           मातृसेवा फाउंडेशन ठाणे, स्माईल टीम यवतमाळ आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार ही स्पर्धा घेण्यात आली. 'शिक्षक ध्येय'चे राज्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वाचक वर्ग आहे.

          राज्यातील महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर विजेत्या उपक्रमांची निवड केली गेली आहे.

          महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित हा उपक्रम राज्यात प्रथमच शिक्षक ध्येय तर्फे राबविण्यात आला आहे.

राज्यातील विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह आणि प्रिंट सन्मानपत्र घरपोच पाठविण्यात येईल तसेच सर्व सहभागी महिलांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र व्हाट्सऍप नंबरवर पाठविण्यात येईल.

          राज्यातील १०७ महिलांनी या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला असून ४६ महिलांना या ठिकाणी कर्तृत्ववान महिला म्हणून पुरस्कार देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

राज्यातील कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्राप्त यादी खालील प्रमाणे:

१. सौ स्मिता नंदकिशोर शिपुरकर एच.के. गिडवाणी कॉस्मोपॉलिटन इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, 131 गुरुद्वारा रोड ,मुलुंड कॉलनी, मुलुंड, मुंबई 400 082

२. श्रीमती मोमीन इशरत हमीद, जिल्हा परिषद शाळा, बिजवडी, ता. इंदापूर जिल्हा पुणे 

३. डॉ. सौ जयश्री महेश मोरे-काळे. कुळगाव बदलापुर नगर परिषद शाळा क्रमांक १६ बेलवली, केंद्र- एरंजाड,तालुका-अंबरनाथ, जिल्हा ठाणे

४ प्रा. सौ. मेघा रोशन पाटील, मोतीलाल कानाजी कनिष्ठ महाविद्यालय, चिंचणी, ता. डहाणू, जि. पालघर

५. निलम आप्पासाहेब सुंबे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सवंदगाव, कें. परसोडा ता. वैजापूर, जि. औरंगाबाद

६. सौ. नमिता उत्कर्ष महाजन, उत्कर्ष प्रतिष्ठान जय प्लाझा दामले चौक अकोला. 444001

७. सौ देवकत्ते रेखा निवृत्तीराव, जि प प्रा शाळा वझरगा ता देगलूर जि नांदेड.

८. प्रा. डॉ. तक्षशिला हरगोविंद मोटघरे, महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क, राजरतन नगर, धामणगाव रोड, यवतमाळ

९. सौ. ज्योती चरणदास चारभे, जि. प. उच्च प्रा. शाळा, कापसी जि. प. वर्धा.

१०. प्रणाली रामचंद्र कोल्हे, जि. प. प्रा. शा. कानकाटी, ता.समुद्रपूर जि.वर्धा

११. सौ. संध्या दत्तात्रय बडवे, विजापुर गल्ली, पंढरपूर, जि. सोलापूर  

१२. कु. अंजली विजय कडू, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा झापल, ता-धारणी मेळघाट, जि. अमरावती

१३. श्रीम. सुनिता निवृत्तीराव देवकत्ते, अंगणवाडी सेविका चोंडी क्रमांक 2, मु.चोंडी (मु.)पोस्ट – कोदळी, ता. उदगिर, जि. लातुर

१४. श्रीम. शितल मोहन झरेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवरासंगम, ता.नेवासा, जि. अहमदनगर.

१५. सौ.रंजिता विठ्ठल देसुरकर, मराठी विद्या मंदिर वरगाव, तालुका-चंदगड जिल्हा-कोल्हापूर.

१६. सौ. रंजना  सुपडू कोळी इंगळे न्यू इंग्लिश स्कूल बेटावद बु!! ता.जामनेर जि.जळगाव

१७. श्रीमती समीना नजीर खलिफा, मु. पो. जत, जि. सांगली

१८. श्रीमती रेखा नंदकुमार पवार मु. पो. बाहेर पेठ, गुंजोटी ता. उमरगा, जि. उस्मानाबाद

१९. श्रीमती अर्चना पांडुरंग आरोटे, जनता विद्यालय लहवित ता नाशिक जि नाशिक

२०. कु वैशाली मोहनसिंह रघुवंशी, आप्पास्वामी विद्यालय ,शेंदूर जना ( अढाव) ता - मनोरा, जिल्हा वाशिम

२१. सुजाता पोपट मेटवटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फडतरे वस्ती, पुणे

२२. सौ अश्विनी जगदीश पाटील विकास विद्यालय पंत नगर, घाटकोपर पूर्व मुंबई

२३. कु. नीता काळुजी तोडकर जि. प. विद्यालय कामरगांव ता.कारंजा लाड जि.वाशीम

२४. श्रीमती अरुणा मुकुंदराव उदावंत, जिल्हा परिषद मराठी शाळा राजुरी बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव

२५. श्रीमती सुरेखा तात्याबा चौरे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथुर्डी, ता करमाळा जि. सोलापूर.

२६. सौ. सुनिता मनोहरराव जतकर, राधानगरी वडगांव ग्रामपंचायतच्या मागे यवतमाळ

ता. जि. यवतमाळ

२७. श्रीमती मीरा मनोहर टेके.जि.प.प्रा. शाळा किरतपूर ता.वैजापूर जि.औरंगाबाद

२८. श्रीमती भारती एकनाथ आल्हाट. जि.प.प्राथमिक शाळा आर्वीकेंद्र ता. जुन्नर जि. पुणे

२९. सौ कविता ज्ञानेश्वर चौधरी. जि प प्रा विद्यामंदिर गारखेडा ता जामनेर जि जळगाव

३०. श्रीम. दिपाली पुंजाराम आहेर, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ईनामबारी ता पेठ जि नाशिक

३१. सौ. आशा अनिल खामकर प्रा.नाथ हरि पुरंदरे प्राथमिक विद्यालय शिवाजीनगर पुणे

३२. योगिता रामचंद्र शिंगाडे, जि. प. प्राथ. शाळा पाईट ता.खेड जि. पुणे

३३. सौ. रोहिणी गणेश हेमाडे कै. चंद्रकांत दांगट पाटील प्राथमिक शाळा, वडगाव बुद्रुक, पुणे

३४. सौ सविता जयंतराव धर्माधिकारी, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कासारखेडा

तालुका लातूर जिल्हा लातूर

३५. कु. वैशाली नामदेवराव चौधरी शहिद जान्या तिम्या जि. प. हाय. व क. महा. गोरेगाव जिल्हा गोंदिया

३६. सविता व्यंकटराव कद, जि. प. प्रा. शाळा टेळकी. तालुका लोहा, जिल्हा नांदेड.

३७. श्रीम. पवार ताई तुकाराम जि. प. प्रा.शा. शेंडगेवाडी. ता. श्रीगोदा. जि. अहमदनगर

३८. विद्या कृष्णराव वालोकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वेळा, जि. वर्धा

३९. डॉ. तनुजा प्रकाश परुळेकर, मुंबई

४०. श्रीमती श्रद्धा आसाराम पवार, श्री. गो से हायस्कूल पाचोरा, जि. जळगाव

४१. सौ. पुष्पावती बाबुराव गोसावी, सामाजिक कार्यकर्त्या, मु. पो. वडनेर भैरव, ता. चांदवड, जि. नाशिक

४२. सौ. शारदा अरुण गणोरकर, आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कांडळी, ता. अचलपुर, जि. अमरावती

४३.  मंजूषा खत्री, सामाजिक कार्यकर्त्या नाशिक

४४. सौ. प्रेमजीत सुनील गतीगंते, श्रीनिवास बागरका कनिष्ठ महाविद्यालय, कला वाणिज्य व विज्ञान, जे. बी. नगर, अंधेरी पूर्व, मुंबई

४५. सौ. सविता नवनाथ शिंदे, सोनी, ता. मिरज, जि. सांगली

४६. श्रीमती उषा तम्मा कोष्टी, जि. प. प्राथमिक शाळा, घरनिकी, ता. मंगळवेढा जि. सोलापूर

          राज्यातील उपक्रमशील, कर्तृत्ववान महिलांनी या स्पर्धेत उत्फुर्तपणे सहभाग नोंदवत ही स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल आम्ही राज्यातील महिलांचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.

          या स्पर्धेसाठी परीक्षक डॉ. बाबासाहेब गणपत बडे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक यांनी पारदर्शक पद्धतीने निकाल जाहीर केल्याबद्दल ‘शिक्षक ध्येय’ परिवार त्यांचे मनपूर्वक आभार मानतो.

          शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार, मातृसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका संध्या (सामंत) सावंत आणि स्माईल टीमच्या संस्थापिका अर्चना भरकाडे आणि शिक्षक ध्येयच्या संपूर्ण राज्यस्तरीय संपादकीय मंडळाच्या वतीने विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!! 

https://shikshakdhyey.com/

 

         

 

 

 

Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...