साप्ताहिक शिक्षक ध्येय ३१ ऑगस्ट २०२० अंक २० वा

 


वरील कव्हर वर क्लिक करून गुगल ड्राईव्हच्या मदतीने आपण ऑनलाईन अंक वाचू शकता... 

मीच माझा रक्षक

भारतात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच, भारत हे कोरोनाचे पुढील मुख्य केंद्र ठरू शकते, अशी चिंता वाढवणारी शक्यता वॉशिंग्टनस्थित ‘सेंटर फॉर डिसिज डायनॅमिक्स'ने व्यक्त केली आहे. 'मीच माझा रक्षक' आहे हे ध्यानात घेत आपण स्वतः स्वतःची पुरेशी काळजी घेण्याबरोबरच घरच्यांची सुद्धा काळजी घेणे आज गरजेचे आहे. सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आणि आवश्यक खबरदारी घेणे ही आज प्रत्येकाची जबाबदारी आहे.

कोरोना विरोधाच्या या युद्धात ‘मीच माझा रक्षक', हे आपण प्रत्येकाने मनाशी बाळगून सामाजिक भान ठेवत यावर मात करू शकतो.

अमेरिकेने ६० टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होऊ शकते हा स्वत:बाबत व्यक्त केलेला अंदाज भारतात लागू केला, तर ६० टक्के भारतीय म्हणजेच सुमारे ८० कोटी नागरिक बाधित होतील. त्यामुळे आता उपाय एकच तो म्हणजे आपण स्वयंशिस्त लावून घेत कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडणे हे आधी प्रत्येकाने मनाशी ठरवले पाहिजे. 'जो घरात राहील तोच यापुढील काळात जगू शकेल' हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. कोरोना विरूद्धचे हे युद्ध फक्त एकट्या सरकारला, सरकारच्या दोनचार यंत्रणांचे काम नाही तर यामध्ये प्रत्येक नागरिकाचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे.

दुर्दैवाने आपल्याकडे लोकांना स्वत:च्या जिवावर येईपर्यंत कशाचीच काळजी किंवा चिंता करण्याची आवश्यकता वाटत नाही, हेच येथे खेदाने नमूद करावेसे वाटते...

साप्ताहिक शिक्षक ध्येय वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आजच आमच्या व्हाटसअॅप ग्रुपला जॉइन व्हा...*

https://tinyurl.com/yb7kv6sp



 खालील लिंक वर क्लिक करून अंक डाऊनलोड करू शकता...

https://drive.google.com/file/d/1LQ5VsK-mNPgXwAXdsfzfqIGokWrvifB2/view?usp=drivesdk





Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग