अंक वाचण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करून गुगल ड्राईव्ह मध्ये open करून वाचनाचा आनंद घ्यावा साप्ताहिक 'शिक्षक ध्येय' २४ ऑगस्ट २०२० अंक १९ वा “ खेलेगा भारत, तो खिलेगा भारत ” मा. नरेंद्र मोदी, पंतप्रधान आपण यंदा २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांची ११५ वी जयंती साजरी करीत आहोत. देशातील सर्व खेळाडूंना प्रेरणास्थान ठरणाऱ्या या महान हॉकीपटूचा जन्मदिवस देशात ‘क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, त्यास प्रोत्साहन मिळावे, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात सर्व प्रकारच्या खेळाविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून भारत सरकारने हा दिवस “ राष्ट्रीय क्रीडा दिवस ” साजरा करण्याचे ठरविले आहे. व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बौद्धिक तसेच शारीरिक श्रम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी तसेच आत्मविश्वास, निरोगी शरीर, एकाग्रता, कार्यकुशलता, सकारात्मकता, सहनशीलता, सहकार्य करण्याची वृत्ती, सांघिक वृत्ती, खिलाडू वृत्ती, स्पर्धात्मक वृत्ती, नेतृत्त्व आदी सर्व गुणांचा विकास करण्यासाठी ‘खेळणे’ आवश्यक आहे. आपल्याकडे एकंदरीतच खेळाला खूपच कमी...
कौशल भारत - कुशल भारत