साप्ताहिक शिक्षक ध्येय 31 जुलै 2023 संपादकीय... अधिकार आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आपल्याला अपेक्षित असलेले स्वातंत्र्य म्हणजे बेरोजगारीपासून , गरीबीपासून , भ्रष्टाचारापासून , बेईमानीपासून, गुन्हेगारीपासून , कुशासनापासून बरोबर ? पण इतकं सर्वसमावेशक स्वातंत्र्य हवं असेल तर वैयक्तिक स्तरावर प्रश्न विचारण्या पलिकडे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो का ? हाही प्रतिप्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे कारण निरीक्षण केले तर लक्षात येईल वरील प्रश्नांना सरकार , समाज याबरोबर प्रत्येक व्यक्तीही तितकाच जबाबदार असतो म्हणूनच त्याचे उत्तर शोधण्यातही एक व्यक्ती म्हणून सहभाग घेणे अगत्याचे ठरते. संवेदनशील माणूस होण्याच्या परीक्षेत आपण नापास होत आहोत. सदया शेतकरी सुरक्षित नाहीत अन् महिलाही सुरक्षित नाही. सहकाराचा स्वाहाकार होतो , शिक्षणाचा बाजार मांडला जातो , रुग्णालये वाढतात पण रुग्ण कमी होत नाहीत. सरकार , पोल...
कौशल भारत - कुशल भारत