महिला दिन विशेषांक मोफत वाचण्यासाठी.. इथे क्लिक करा राज्यातील ३४ महिलांना 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार' जाहीर मातृसेवा फाउंडेशन (ठाणे); यशो मंगल एज्युकेशनल कन्सल्टन्सी, (हिंगणघाट, वर्धा); श्री. विलास व्हटकर, मुंबई आणि शिक्षक ध्येय, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय 'कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२५' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज जागतिक महिला दिनानिमित्त या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतर सर्व नागरिकांना व्हावी, त्यांच्या कार्याला उत्तेजन देणे, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ३४ महिलांना ‘कर्तृत्ववान महिला’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये : प्रमिला भास्करराव आखरे (अमरावती); रेखा नामदेव गांगुर्डे, (नाशिक); डॉ. सुमाया रेशमा (ठाणे); कविता धन्यकुमार हिंगमिरे (सोलापूर); सौ. अंजली माणिक कुंदरगी...