Skip to main content

आय. टी. आय. : वेल्डर

 




वेल्डर

दोन अथवा त्याहून अधिक धातूंना जोडण्याच्या प्रक्रियेला ‘वेल्डिंग’ असे म्हटले जाते, तर वेल्डिंग करणाऱ्या कारागिरास ‘वेल्डर’ म्हणतात.

भारतात दरवर्षी अंदाजे ६० दशलक्ष टन पोलादाचा वापर होतो. त्यातील बहुतेक पोलाद हे रेल्वेगाड्या, अवजड वाहने, पूल आदी ठिकाणी वापरले जाते. देशात मॅन्युफॅक्चारिंग, पायाभूत विकास, वीजनिर्मिती, जहाज बांधणी, रेल्वे, बिल्डींग बांधकाम, ऑटो क्षेत्र, संरक्षण साधने अश्या विविध क्षेत्रांचा झपाट्याने विकास होत आहे. या प्रत्येक क्षेत्रात स्टीलच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. भारतात दरडोई स्टीलचा वापर जेमतेम ६० किलो असून अमेरिकेत हेच प्रमाण दरडोई ३०० किलो आहे. इतर देशांचा विचार करता जगाची सरासरी २१५ किलो स्टीलची आहे. पुढील पाच वर्षात स्टीलच्या प्रमाणात तिपटीने वाढ होणार असून मोठ्या प्रमाणात कुशल वेल्डरची गरज लागणार आहे. याचाच विचार करून सद्या राज्यात माध्यमिक शाळेतच विद्यार्थ्यांना मल्टी स्कील अंतर्गत वेल्डिंगचे प्रशिक्षण दिले जाते. यात प्रामुख्याने वेल्डिंगचे प्रकार आर्क, गॅस, फोर्ज वेल्डिंगचे प्रात्यक्षिक, विविध जोड, वेल्डिंग करतांना घ्यावयाची काळजी, प्रीहिटिंग, वेल्डिंगच्या सहाय्याने चप्पल स्टन्ड, घडवंची, पुस्तक ठेवणी तयार करणे आदींचे प्रशिक्षण दिले जाते.

देशातील औद्योगिक क्षेत्रातील वेल्डिंग टेक्नोलॉजी क्षेत्रात कुशल कामगारांची संख्या कमी आहे. सध्या भारतात दीड लाख कुशल वेल्डरचा तुटवडा आहे. स्टीलचा वापर वाढल्यास व्यावसायिक कुशल वेल्डरचा आणखी तुटवडा निर्माण होऊ शकतो. कुशल वेल्डर निर्माण करण्यासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग’ या प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या देशभरात १४ शाखा असून ही संस्था जागतिक स्तरावर काम करणाऱ्या ‘इंटरनशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग’ ची सभासद आहे. या संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचे वेल्डिंगचे विविध कोर्सेस घेतले जातात. गेल्या पाच वर्षात भारतात केवळ ६०० प्रमाणित वेल्डर प्रशिक्षित झाले. तर याच काळात चीनने तब्बल २२००० वेल्डर प्रशिक्षित केले आहे. पुढील दहा वर्षात भारताला पायाभूत क्षेत्रातील विकास कामांसाठी ९०००० कुशल वेल्डरची गरज भासणार आहे. आज अरब राष्ट्रात तसेच ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, आफ्रिका या देशात वेल्डरला चांगल्या पगारावर मागणी आहे. आयटीआय मधील वेल्डर या कोर्स व्यतिरिक्त मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन वेल्डिंग ऑपरेशन, इंटीग्रेटेड कोर्स इन बेसिक वेल्डिंग, सर्टिफिकेट कोर्स इन अॅडव्हान्स वेल्डिंग, सर्टिफिकेट कोर्स इन आर्क वेल्डिंग, गॅस वेल्डिंग आदी कोर्स इंडो जर्मन टूलरूम औरंगाबाद येथे उपलब्ध आहे. या सर्व कोर्ससाठी दहावी उत्तीर्ण पाहिजे. बारावी सायन्स, तंत्रनिकेतन पदविका, अथवा इंजिनिअरींग पदवीधर विद्यार्थी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग’ या संस्थेत अभ्यासक्रमांसाठी नाव नोंदवू शकतात. याची सविस्तर माहिती www.iiwindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. येथे ‘मास्टर इन वेल्डिंग टेक्नोलॉजी’ हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम उपलब्ध असून इंजिनिअरींग शाखेतील पदवीधर विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.

वेल्डिंगचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महावितरण, महानगरपालिका, खासगी कंपनी, एस टी महामंडळ, टेलिफोन कार्यालय, रेल्वे विभाग, बांधकाम विभाग, विविध लॅब टेक्निशियन, आयटीआय, तंत्रनिकेतन, तसेच विविध शाळा, महाविद्यालय यातील तांत्रिक शिक्षक, व्यवसाय प्रशिक्षक आदी ठिकाणी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील करू शकतो. यात वेल्डिंग वर्कशॉप सुरु करू शकतो. विविध कंपनीत ट्रेनी वेल्डरला 15 ते 20 हजार रुपये प्रतिमाह वेतन दिले जाते. कुशल वेल्डरला प्रतिमाह वीस ते चाळीस हजार रुपये वेतन दिले जाते. तसेच स्वतःचे वर्कशॉप असल्यास यातून तीस ते साठ हजार रुपये प्रतिमाह कमाई होऊ शकते.

प्रत्येक गावात गल्लोगल्ली आपण अनेक फॅब्रीकेशनचे वर्कशॉप पाहतो. वेल्डिंगचे महत्त्व इथेच आपल्याला जाणवते.

मधुकर घायदार नाशिक 9623237135 

Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

  10 वी+ ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात? रेल्वेत नोकरी करायची? Railway Recruitment Board, Government of India यांनी असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilots) या एकूण 5696 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी. 28 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.. Click here https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz