प्रवेश कसा घ्यावा?
डिप्लोमा इन फार्मसी (D. Pharm.)
मधुकर घायदार, 9623237135
·
उदिष्टे : रिटेल
फार्मसी तसेच फार्मास्युटिकल कंपन्यांमधील आवश्यक कौशल्ये आणि वैद्यकीय ज्ञान
विद्यार्थ्यांना अवगत करणे हेच डी फार्मचे उदिष्ट आहे. पारंपारिक शिक्षणात पदवीधर
झाल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे फार्मसी डिप्लोमा (डी फार्म
पदविका) करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल सद्या वाढत आहे. कुशल फार्मासीष्ट तयार करणे
तसेच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारला लावणे हेच फार्मसी पदविकाचे उदिष्ट.
·
व्याप्ती :
राज्यात एकूण ४३८ शासकीय तसेच खासगी फार्मसी महाविद्यालये आहेत. यात सुमारे ३६
हजार १३३ जागा उपलब्ध आहेत.
·
शैक्षणिक अर्हता : पदविका
फार्मसीसाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास जीपीएटी, जेईई फार्मसी,
यूपीएसईई, सीपीएमटी, पीएमईटी, एयूआयएम फार्मसी या प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश
दिला जातो.
·
कालावधी : डी
फार्मसी पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षाचा असून पदविकानंतर बी. फार्मसीत थेट
दुसऱ्या वर्षात (फार्मसी पदवी) प्रवेश घेता येतो.
·
आवश्यक कागदपत्रे :
शाळा सोडल्याचा दाखला, दहावीची गुणपत्रिका, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन
क्रिमिलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग/सैन्यदल/अल्पसंख्यांक प्रमाणपत्र, आधारकार्ड,
राष्ट्रीयकृत बॅंक पासबुक, पासपोर्ट फोटो, इत्यादी.
·
आरक्षण व सुविधा :
पदविका अभ्यासक्रमांत सरकारी नियमाप्रमाणे प्रत्येक प्रवर्गासाठी तसेच मुलींना ३० टक्के आरक्षणही ठेवण्यात आले आहे.
प्रशिक्षणार्थीना प्रवर्गानुसार वार्षिक वसतिगृह निर्वाह भत्ता ८००० ते ३००००
रुपये असतो. एस टी सवलत पास, वैद्यकीय सुविधा, आदी देण्यात येते. https://mahadbtmahait.gov.in
या संकेतस्थळावर अर्ज केल्यास अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी २५०००
रुपये शिष्यवृत्ती मिळते.
·
प्रवेश प्रक्रिया व संकेतस्थळ :
राज्यातील फार्मसी पदविका प्रवेशासाठी शासनामार्फत ऑनलाईन सामायिक प्रवेश
प्रक्रिया राबविली जाते. शासकीय/खासगी फार्मसी महाविद्यालयाची यादी आणि
अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक पात्रता, प्रवेशाचे वेळापत्रक इतर नियम www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर बारावी निकालानंतर
उपलब्ध असते.
·
डिप्लोमा इन फार्मसी प्रवेश
माहितीपुस्तिका : CLICK HERE इथे क्लिक करा यावर
उपलब्ध आहे.
· संधी / फायदे : भारतातील फार्मास्युटिकल कंपनीत नोकरीची संधी तसेच आरोग्य केंद्रे, केमिस्ट दुकाने, संशोधन संस्था, रुग्णालये यात फार्मासिस्ट, वैज्ञानिक अधिकारी, गुणवत्ता विश्लेषक, उत्पादन व्यवस्थापक, वैद्यकीय ट्रान्सक्रिप्सनिष्ट म्हणून नोकरी मिळू शकते. स्वतःचे मेडीकल सुरु करता येते. फार्मासिस्टला अनुभवानुसार वार्षिक दोन ते तीन लाख पगार दिला जातो.
मधुकर घायदार, नाशिक 9623237135
Comments
Post a Comment