हेअर कटिंग सलून
भारतात
उद्योगांची मुख्य तीन क्षेत्रे आहेत. एक म्हणजे कच्चा माल उत्पादन, दुसरे
वस्तू उत्पादन आणि तिसरे म्हणजे सेवा क्षेत्र.
कच्चा
माल आणि वस्तू उत्पादनाच्या तुलनेत सेवा क्षेत्र आजही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत
आहे.
सेवा
क्षेत्रात भारताचा जगात अकरावा क्रमांक असून यातील जीडीपीचा हिस्सा सुमारे एक हजार
दोनशे अब्ज डॉलर एवढा आहे.
आजकाल
महिला असो वा पुरुष दोन्हीही आपल्या सौंदर्याप्रती जागरूक झालेले आहेत. महिला
व पुरुषांसाठी वेगवेगळे सलून आपण बघतो. आजकाल ‘हेअर कटिंग सलूनच्या
व्यवसायाने कात टाकली आहे. पूर्वी फक्त दाढी, कटिंगसाठी
मर्यादित असणारा हा व्यवसाय आजकाल फाईव्ह स्टार व्यवसाय झालेला आहे. फार
पूर्वीपासूनच सौंदर्याला विशेष महत्त्व दिले जात आहे.
आणि
आजही त्याचे महत्त्व तसेच टिकून आहे. पूर्वी सौंदर्यवृद्धीकरिता
विशेष साधने उपलब्ध नव्हती. आज आधुनिकीकरणाने, बदलत्या
जीवनशैलीमुळे सौंदर्यवृद्धीकरिता अनेक प्रकारची साधने बाजारात उपलब्ध झालेली आहेत.
शासन
स्तरावर देखील कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत युवकांना सलून व्यवसायाचे प्रशिक्षण
दिले जाते. सलून दुकानात प्रशिक्षणार्थी म्हणून काम
करीत अनेकांनी हे हेअर कटिंगचे ज्ञान आत्मसात केले आहे.
थेरीपेक्षा
प्रॅक्टिकल ज्ञानावर भर देत हे ज्ञान एकाकडून दुसऱ्याकडे जात आहे. पण
हेअर कटिंग सलून व्यवसायासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे तेवढेच गरजेचे आहे. सलूनचे
प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आज कार्यरत आहेत.
मात्र
या व्यवसायासाठी अंगी काही कौशल्ये हवीतच.
सलून
व्यवसाय सुरु करण्यासाठी एक दुकान, आकर्षक खुर्ची, आरसे, वेगवेगळ्या
आकारातील कात्री, कंगवे,
मेकअप
कीट, हेअर कीट,
वॉश
बेसीन, हेअर ड्रायर,
मशाजर, स्टीमर
इत्यादी प्राथमिक वस्तूंची आवश्यकता असते. सलूनची जागा, ग्राहकांचे
समाधान, स्वच्छता व टापटीपपणा,
कच्च्या
मालाचा दर्जा, संभाषण कौशल्य आदी बाबींवर याचे यश अवलंबून
असते.
आजकाल
विविध नामांकित सलून व्यवसायाची फ्रँचाइझी घेऊन देखील युवक हा सलून व्यवसाय सुरु
करू शकतो. त्यात प्रामुख्याने जावेद हबीब हेअर अँड
ब्युटी सलून, व्हीएलसीसी,
मॅट्रिक्स
सलून, काया स्क्रीन क्लिनिक,
सॅक्स
हेअर अँड ब्युटी, लोरेअर प्रोफेशनल सलून,
स्टार
अँड सितारा सलून, अरोमा मॅजिक सलून,
लुक्स
सलून इत्यादी नामांकित कंपन्यांची फ्रँचाइझीद्वारे युवक सलून व्यवसायास सुरुवात
करू शकतात. त्या त्या कंपनीद्वारे व्यवसायाचे प्रशिक्षण
व मार्गदर्शन केले जाते. यात प्रामुख्याने निरनिराळे हेअरकट, हेअरस्टायलिंग, हेअर
कलरिंग, ट्रायकोलॉजी,
हेअर
ट्रीटमेंट, हेड मसाज,
हेअर
पमिंग, हेअर स्ट्रेटिंग,
हेअर
ड्रेसिंग, मेकअप,
फेशिअलच्या
अॅडव्हान्स ट्रीटमेंटयांचा समावेश होतो. स्वतःचे किंवा भाडे तत्वावर
दुकान घेऊन पन्नास ते ऐंशी हजारांत सलून व्यवसाय सुरु करता येतो. यातून
सुरुवातीला दहा ते वीस हजार प्रती महिना कमाई होऊ शकते.
दोन ते
चार लाख भांडवलातून सलून व्यवसाय सुरु केल्यास यातून वीस ते साठ हजार प्रती महिना
कमाई होऊ शकते. पारंपारिक सलूनपेक्षा आजकाल शहरात तसेच
तालुक्याच्या ठिकाणी आधुनिक सलून आपण पाहतो. सलूनसाठी सुमारे तीनशे ते चारशे
स्वेअरफूट जागेची आवश्यकता असते. सलून व्यवसायासाठी कौशल्याची
खूप आवश्यकता आहे. नाविन्यता आणि सराव यांची योग्य सांगड घालत
उत्तम सलून व्यवसाय युवक सुरु करू शकतो.
हेअर कटिंग सलून हे एक सृजनात्मक, आव्हानात्मक आणि वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे ज्यामध्ये नवीन व्यवसायास भरपूर वाव आहे. मात्र यात यश मिळविण्यासाठी दांडगा जनसंपर्क, सुसंवाद साधण्याचे कौशल्य, आत्मविश्वास, कल्पकता असणे गरजेचे आहे.
मधुकर घायदार नाशिक 9623237135
Comments
Post a Comment