Skip to main content

एसटी: आता कंडक्टरला करा फोन पे... जी पे...

 



एसटी: आता कंडक्टरला करा फोन पे... जी पे...

सुट्ट्या पैशांचा प्रश्न मिटला...


राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व बसमध्ये आता प्रवाशांना एसटीचे तिकीट ऑनलाइन देता येणार आहे. त्यामुळे सुट्ट्या पैसांची कटकट सुटणार असून, जागेवर बसून वाहकाकडील मशीनवर असलेल्या क्यूआर कोड स्कॅन करायचा आणि आपले तिकीट घ्यायचे. त्यामुळे प्रवाशी आणि एसटीला याचा फायदा होणार आहे.

   राज्यातील सर्व विभागातील आगारांमधून धावणाऱ्या एसटी बसमध्ये ही ऑनलाइन तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक (वाहतूक) यांनी विभाग नियंत्रकांना नुकतेच कळविले आहे. आज चहावाल्यापासून मॉलपर्यंत सगळीकडे ऑनलाईन पैसे देवाण- घेवाण करण्याची सुविधा आहे. मात्र, दररोज लाखो रुपयांचे 

कलेक्शन असलेल्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये ऑनलाईन सुविधा का नाही? असा प्रश्न प्रवाशांकडून अनेकवेळा उपस्थित केला जात होता. त्याप्रमाणे एसटीतही दररोज सुट्टे पैशावरून प्रवाशी आणि वाहक यांच्यात शाब्दीक वाद होत असे. त्यामुळे एसटी विभागाने माहिती तंत्रज्ञानाला आत्मसात करून प्रवाशांना ऑनलाइन तिकीट मिळावे, यासाठी पहिल्या टप्प्यात क्यूआर कोडच्या माध्यमातून तिकीट देण्याची व्यवस्था सर्व बसमध्ये करण्यात आली आहे. तर, पुढील टप्प्यात प्रवाशांना डेबीट व क्रेडीट कार्डवरून देखील तिकीट काढण्याची सोय केली जाणार आहे. तसेच, वाहकांना देखील आता रोख पैसे जास्त बाळगावे लागणार नाहीत. एसटी महामंडळाने सर्व विभागांना ही सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

@पैसे कट झाल्यास तक्रारीची सोय

  ऑनलाइन तिकीट काढताना कोणतेही पैसे कट झाले आणि तिकीट न आल्यास प्रवाशांना मदत मिळणार आहे. त्यासाठी एसटीकडून '४००' हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. तसेच, नागरिक ८८००६८८००६ या क्रमांकास संपर्क साधू शकतात. त्याबरोबरच wecare@airtelbank.com येथे संपर्क साधून नागरिक मदत मागू शकतील. हे क्रमांक हे २४ तास उपलब्ध असणार आहेत. 


प्रवाशांना चिल्लर पैसे परत करण्यापासून वाहकाची मुक्तता

     एस टी महामंडळ तंत्रज्ञानाला आत्मसात करून प्रवाशांना आॅनलाईन तिकीट मिळावे म्हणून पहिल्या टप्प्यात QR कोड स्कॅन करुन तिकीट देण्यात येणार आहे. पुढे जाऊन डेबिट, क्रेडिट कार्ड वरुन देखील प्रवाशांना तिकीट मिळणार आहे. प्रवाशांना ऑनलाईन तिकीट सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांना चिल्लर पेसै परत करण्यापासून वाहकाची मुक्तता होणार आहे.


(शिक्षक ध्येय नेटवर्क: प्रभाकर कोळसे, कार्यकारी संपादक 9823539325)


https://chat.whatsapp.com/GdDvpSNPQ4oG158NQNLwwc


https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz




Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

  10 वी+ ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात? रेल्वेत नोकरी करायची? Railway Recruitment Board, Government of India यांनी असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilots) या एकूण 5696 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी. 28 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.. Click here https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz