साप्ताहिक शिक्षक ध्येय 18 डिसेंबर 2023

 



साप्ताहिक शिक्षक ध्येय 18 डिसेंबर 2023

संपादकीय... 

... आणि कष्टाचे संपत नाही...!


देशाला स्वातंत्र्य मिळाले. विकास झाला पण समस्या मात्र त्याच राहिल्या. आज आपला देश अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असला तरी रोज कित्येक लोकं मात्र उपाशीपोटी झोपतात. देशात उद्योग धंदे वाढले तरी कुशल कामगारांअभावी बेकारी वाढतच आहे. आजही देशात सुमारे ४२ टक्के लोकं दारिद्र्य रेषेखाली आहेत.

वाढती लोकसंख्या, महागाई, दर्जेदार शिक्षणाचा अभाव, व्यावसायिक शिक्षणाचा अभाव, घसरलेली गुणवत्ता, व्यवसाय शिक्षणाचा सुमार दर्जा, शैक्षणिक  गुणवत्ता, नीतिमत्ता, पुरेसे काम न करता आयता पगार मिळविणारी वृत्ती, कष्ट न करता शॉर्टकट मार्गाने पैसे कमविण्याची तरुणांची मानसिकता, सर्व विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार, मुल्यांपेक्षा व्यक्ती पूजेस आलेले महत्त्व अशा अनेक कारणांमुळे भ्रष्टाचारच जणू शिष्टाचार झाला आहे. 

दुर्दैव म्हणजे, आता या प्रश्नांची उत्तरे मिळाली किंवा मिळाली नाहीत तरीही हे असेच चालायचे! असे मान्य करून घेणारा समाधानी समाज सभोवती तयार झाला आहे.

समाजात चैनीचे जीवन जगण्यासाठी जास्त पैशाची गरज पडू लागली अन् ते मिळविण्यासाठी विविध मार्गांचा शोध लागला. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यास मूर्ख ठरविले गेले. आपले कर्तव्य असतांनाही त्याच कामाचे पैसे मागितले जाऊ लागले. समाजात पाच अंकी पगार घेणारा व्यक्ती जेव्हा पाचशे रुपये रोज कमावणाऱ्या व्यक्तीकडून पाचशे रुपये लाच घेतो. तेथेच माणुसकी संपली. सर्वसाधारणपणे व्यवस्थेपुढे हतबल होऊन पैशाची देवाण घेवाण होते. भ्रष्टाचाराला बळी पडतो तो अशिक्षित, गरीब, मध्यमवर्गीय बिचारा समाज. जिथे कुंपणच शेत खातं तिथे तक्रार करायची कुणाकडे? हा यक्ष प्रश्न त्याच्यापुढे उभा राहतो.

शेवटी एकच म्हणावेसे वाटते... हातातले गेले तरी नशिबातले कुणीच घेऊ शकत नाही... कारण फुकटचे पुरत नाही आणि कष्टाचे संपत नाही...!


साप्ताहिक शिक्षक ध्येय 18 डिसेंबर 2023

अंक वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग