Skip to main content

शिक्षक ध्येय, २७ नोव्हेंबर २०२३

 


संपादकीय...

 

 

शिक्षण म्हणजे काय?

    

शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे आदर्श नागरिक घडणं, संकुचितपणा, स्वार्थीपणा नष्ट होणं, जीवनातील नैतिक मूल्यांचे संगोपन आणि संवर्धन, समाजाशी जोडलं जाणं, पर्यावरण समजणं, चांगले - वाईटाचे ज्ञान होणं, कष्ट करण्याची तयारी निर्माण होणं म्हणजेच खरं शिक्षण! हे सर्व म्हणजे शिक्षण असेल तर हे सर्व कुठं मिळतं आहे आपल्या मुलांना?

मुलं शिकण्यासाठी शाळेत जातात, शिकतात कारण ती या जगात नवी असतात. जग समजून घेण्यासाठी ते शाळेत जातात. खरं तर शिकण्यासाठी ना शिक्षेची गरज, ना बक्षिसाची. मुलांना त्यांचे कुतूहल शमविणारं शिक्षण पाहिजे असतं.

शिक्षण आनंददायी असावं, त्याचं ओझं वाटू नये, ते मुलांवर लादलं जाऊ नये, मुलांना आवडावं, त्यांचे कुतूहल जागृत व्हावं, भविष्यासाठी उपयोगी पडावं, जीवनाचा मार्ग सुकर करणारं शिक्षण हवं, कारण मानवाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणावरच अवलंबून आहे. माणूस आणि पशु यांमधील अंतर ओळखायचं साधन म्हणजे शिक्षण होय.

आजकाल शिक्षण म्हणजे शाळेत जाणे, शिक्षकांचे शिकविणे, पुस्तके वाचणे, परीक्षा देणे, उत्तीर्ण होणे झाले शिक्षण! खरं तर शिक्षण म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत सुरु असणारी निरंतर प्रक्रिया आहे.

शिक्षण ही एक अशी संपत्ती आहे, जी कोणी चोरु शकत नाही, जी दुसऱ्याला दिल्यावर कमी होत नाही तर तिच्यात वाढच होते आणि शिक्षण ही अशी भेट आहे जी देणाराही परत घेऊ शकत नाही.

स्वत:ला घडविण्यासाठी शिक्षणाचा उपयोग व्हायला हवा पण शिक्षणात काय साधन आहे आणि काय साध्य आहे या गोंधळात आज शिक्षणाचे 'ध्येय' हरवले आहे.

ज्ञानाचे भांडार, विश्वास, सदाचार, पावित्र्य, सुख, आनंद आदि सगळ्या शब्दांचा पर्याय आहे 'शिक्षक'. शिक्षकाचे खरे भांडवल असते नैतिकता आणि चारित्र्य. हे ज्याच्याकडे आहे अशा शिक्षकाचे जीवन नक्कीच सार्थ आणि धन्य होते.

शेवटी, जर शिक्षणाने आपल्याला एवढेही समजले नाही तर शिक्षण हवे कशासाठी?...

साप्ताहिक शिक्षक ध्येय, 

२७ नोव्हेंबर २०२३ 

अंक वाचण्यासाठी.......

इथे क्लिक करा.. Click Here 

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२५

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी (१४ नोव्हेंबर रोजी) निकाल   शिक्षक ध्येय आणि प्रायोजक 1, प्रायोजक 2, प्रायोजक 3, प्रायोजक 4 पाहिजेत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२५ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात...

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

  राज्यातील महिलांसाठी  कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६       राज्यातील महिलांसाठी     कर्तृत्ववान  महिला  पुरस्कार   २०२६     राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२६ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाऊंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, वर्धा  यांच्या संयुक्त विद्यमाने     राज्यातील महिलांसाठी  ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘ना नफा ना तोटा’  या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून ,  प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.  ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक ,  पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आय...

महाराष्ट्र पोलीस विभागात विविध पदांच्या 15,631 जागांसाठी भरती जाहीर

  महाराष्ट्र पोलीस विभागात विविध पदांच्या 15,631 जागांसाठी भरती जाहीर  महाराष्ट्रातील 45 जिल्ह्यात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, सशस्त्र पोलिस शिपाई, कारागृह शिपाई आदि 15,631 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2025. 32 पानांची जाहिरात PDF वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..  CLICK HERE आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/Hv8ks0QrXgDEXIRf5pd4ZO?mode=wwt क्लास प्लस ॲप सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz