Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय 21 ऑगस्ट 2023

 


संपादकीय...

 

 

मोबाईल: असून अडचण, नसून खोळंबा...  


कोविड नंतर सर्वांचाच मोबाईल वापर वाढलेला आपणास दिसून येईल. सतत, दररोज, नियमित २१ दिवस एखादी कृती केली तर २२ दिवशी व त्यानंतर ती आपोआपच अंगवळणी पडते. तशीच काहीशी अवस्था मोबाईल वापराबाबत झाली आहे. बरं मोबाईल वापरायला कोणतेही वयाचे बंधन नाही. अगदी बाळ जेवत नसेल तरी त्याच्या हाती मोबाईल देऊन आपला कार्यभाग साधला जातो. रडत असेल तरी हाच रामबाण उपाय.

आज मोबाईलमुळे घराघरातील एकमेकांमधील संवाद कमी कमी होत चालला आहे. आज आईवडिलांना मुलांशी आणि मुलांना आईवडिलांशी बोलायला वेळ नाही. जेही थोडेफार बोलणे होते तेही मोबाईलवरच.

आज प्रत्येकाच्या हाती एक स्मार्ट फोन आहे. भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असल्याने सर्वांच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असते. स्मार्ट फोन न वापरणारा आज अशिक्षित ठरत आहे.

मुलांना तर स्मार्ट फोन हा एक अल्लाउद्दिनचा चिराग हाती लागला असे वाटते. काय नाही या स्मार्ट फोन मध्ये. विविध वेबसाईट, यु टुब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आदीसह हमखास टाईमपास करणारे विविध रिल्स, व्हॉट्सॲपचे स्टेटस, बातम्या, टिव्ही चॅनल आहेच. अगदी तहान भूक विसरुन मुले, तरुण, तरुणी मोबाईलवर टाईमपास करीत असतात. याला काही अपवाद असू शकतात.

मोबाईलवर अभ्यास जरी करीत असेल तरी अधून मधून येणाऱ्या विविध जाहिराती लक्ष विचलित करतात आणि मुले - मुली नको त्या गोष्टी बघतात, वाचतात. परिणामी त्या गोष्टींचे त्यांना कालांतराने व्यसन लागते. त्यांच्या मनावर आणि वागणुकीवर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसतो. समाजामध्ये ते वावरतांना हिंसक प्रतिक्रिया देताना दिसतात.

मोबाईल फोनचा वापर आपणास सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे करता येतो. कोणत्या प्रकारे करायचा हे आपल्या हातात आहे.

आज जरी मोबाईल फोन हा जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला असला तरी मोबाईलवर गेम खेळायचा की आयुष्याचा गेम  (खेळखंडोबा) करायचा हे शेवटी आपल्याच हातात आहे. आज मोबाईलसह पिंजऱ्यात कैद व्हायचे की मोबाईल बाजूला ठेऊन एका फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात उंच भरारी घ्यायची हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.


साप्ताहिक शिक्षक ध्येय चा  अंक वाचण्यासाठी .. . .  

CLICK  HERE

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...