इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील संधी

 



इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील संधी

आजही दहावी अथवा बारावी नंतर करिअरच्या वाटा शोधतांना युवक अभियांत्रिकी शिक्षणाला प्रथम क्रमांकाची पसंती दर्शवतात. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग ही सर्वांत मोठी व विविध क्षेत्रात प्रभाव असणारी अभियांत्रिकी शाखा आहे. आपल्या जीवनामध्ये आधुनिक मशीन्स आणि गॅझेटच्या वाढलेल्या वापरामुळे ते अधिक विश्वासार्ह बनविण्याच्या वाढत्या मागणीमुळे इलेक्ट्रिकल इंजिनीअर - विद्युत अभियंत्यांच्या रोजगाराच्या संधीमध्ये सद्या वाढ होत आहे. घरापासून ते औद्योगिक आणि अवकाश अनुप्रयोगांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात विद्युत अभियंते आवश्यक आहेत. अलीकडील काळात सेमीकंडक्टर, संप्रेषण नेव्हिगेशन सिस्टम, नेट्वर्किंग, संगणक आणि डेटा विश्लेषण यासारख्या प्रगत तंत्रज्ञानात देखील इलेक्ट्रिकल इंजिनीअरचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.  

पारंपारिक व अपारंपारिक उर्जा शोध, वीजनिर्मिती, वीजवापर, वितरण, नियंत्रण, देखभाल, केंद्र उभारणी, व्यवस्थापन, रुपांतर, संरचना, रेखाटन, विद्युत प्रवाह मोजणी, विद्युत उपकरण निर्मिती, सुरक्षा व्यवस्थापन इत्यादी विद्युत बाबींचा विद्युत अभियांत्रिकीमध्ये समावेश होतो.

इलेक्ट्रिकल इंजिनीअरला विविध क्षेत्रात नोकरीची तसेच व्यवसायाची अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने एमआयडीसी मधील विविध कंपन्या टाटा मोटर्स, एल अंड टी, जिंदल स्टील, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया, स्टील ऑथोरीटी ऑफ इंडिया लिमिटेड, गेल, नेशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, एन एस पी सी एल, स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड, केंद्रीय रेल्वे सेवा, केंद्रीय संरक्षण विभाग, जलसंपदा व पाणीपुरवठा विभाग, ऊर्जा निर्मिती केंद्रे, केंद्रीय संशोधन संस्था उदाहरणार्थ इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) बी.आर.सी. (भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर), केंद्रीय खाणकाम विभाग, बदलत्या काळानुसार विद्युत अभियंते, बँकिंग क्षेत्रे, नेटवर्क आणि संप्रेषण क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी विविध उपकरणे व यंत्रांची देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामात देखील इलेक्ट्रिकल इंजिनीअर आपले करिअर करू शकतात. मुख्य म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनीअर केंद्रीय लोकसेवा आयोग व विविध राज्यांचे लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या माध्यमांतून भारत सरकार व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांत अधिकारी पदांवर देखील कार्य करू शकतात.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक मागास प्रवर्ग तसेच अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्याना शासनामार्फत शिष्यवृत्ती मिळू शकते. या शिवाय फी भरण्यासाठी वेगवेगळ्या बँकांकाडूनही शैक्षणिक कर्ज मिळते.

युवकांना विद्युत अभियांत्रिकी शाखेमध्ये आपले करिअर घडवू इच्छितात त्यांच्यासाठी दहावीनंतर पदविका व बारावीनंतर पदवी असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

विद्युत अभियांत्रिकी शाखा ही कालानुरूप विकसित होत जाणारी शाखा असल्यामुळे युवकांनी यात करिअर करून आपल्या देशाच्या प्रगतीत हातभार लावावा हीच अपेक्षा.

मधुकर घायदार

9623237135


https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF


https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग