Skip to main content

इंजिनिअर व्हायचयं...

 



इंजिनिअर 

विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य यांचा वापर करून सर्वसामान्य माणसाचे जगणे सुखकर करणे, हेच इंजिनिअर - अभियंत्यांचे काम आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा विस्तार सर्वव्यापी झाला आहे, त्यामुळेच रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध असून, भविष्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रचंड मागणी असणार आहे. सध्या अभियांत्रिकी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. त्यामुळे अभियंता बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वासाने अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घ्यावा.

अभियांत्रिकी, अर्थात इंजिनीअरिंग शिक्षणाविषयी वाटणारं आकर्षण आपल्याकडे आजही कायम आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या जागादेखील वाढताना दिसतायत. पण अशा वेळी स्वाभाविकच मनात प्रश्न उभे राहतात, की खरंच इतक्या अभियंत्यांची आवश्यकता आहे का?

इंजिनीअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये विविध विद्याशाखांबाबत अनभिज्ञता असते. नेमकी कोणती विद्याशाखा निवडायची, त्या शाखेतून पुढे नोकरीच्या नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या विषयातल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार शाखेची निवड करावी. अधिक क्षेत्रात रोजगारांच्या संधी हव्या असल्यास मूळ शाखांची निवड योग्य ठरतं. (उदा. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल) स्पेशलाइज्ड शाखांची निवड पदवीच्या वेळेस केल्यास आपल्या रोजगाराच्या संधी त्या शाखेपुरत्याच मर्यादित राहतात. उदा. ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग शाखेची निवड केल्यास केवळ वाहन उद्योगापुरतच्या नोकरीच्या संधी मर्यादित राहतात. त्याऐवजी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची निवड केल्यास पुढे एरोस्पेस, मरिन, ऑटोमोबाइल, रेफ्रिजरेशन, प्रॉडक्शन, ऑटोमेशन यांसारख्या अनेक इंजिनीअरिंग क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. 

फ्लिपकार्ड, स्नॅपडील यांसारखी ऑनलाइन बाजारपेठही अभियंत्यांनीच बनवली आहे. केंद्र सरकारने कौशल्य विकास अंतर्गत  ‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स पॉलिसी-२०१९’ तयार केली असून यामध्ये हजारो कोटींची गुंतवणूक होणार असून, त्यातून अभियंत्यांसाठी एक कोटी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी आशा आहे. नॅनो टेक्‍नॉलॉजी, आयटी, एरोनॉटिक्‍स अशा नव्या अभियांत्रिकी शाखा सुरू झाल्या असून, त्यांचेही क्षेत्र विस्तारत आहे. आजही अभियंत्यांना नोकरीच्या कोट्यवधी संधी उपलब्ध आहेत. पण त्याने त्या त्या क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करायला हवीत. आजही अभियांत्रिकीची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळते. त्यांतील चाळीस टक्के विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्याबरोबरच कॅंपस इंटरव्ह्यूमधून निवडले जातात. यूपीएसी, एमपीएससी परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अभियंत्यांचे प्रमाण अधिक आहे. बॅंकिंग क्षेत्रातही व्यवस्थापन, वित्त नियोजन आणि तांत्रिक विभागात अभियंते मोठ्या पगारावर काम करतात. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर जर व्यवस्थापकीय शिक्षण घेतले, तर रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध आहेत. 

राज्यात पदवी अभ्यासक्रमाचे ३७६ महाविद्यालय असून पदविका अभ्यासक्रमाचे ४९३ तंत्रनिकेतन आहेत त्यांची अनुक्रमे प्रथम वर्ष प्रवेश क्षमता १,५९,०३७ आणि १,८१,९३७ आहे. अभियंता बनायची इच्छा असेल तर कोणतीही भीती न बाळगता या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा पण त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेण्याची तयारी हवी.


जॉईन व्हा..

https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF

शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय 

https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

  10 वी+ ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात? रेल्वेत नोकरी करायची? Railway Recruitment Board, Government of India यांनी असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilots) या एकूण 5696 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी. 28 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.. Click here https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz