Skip to main content

व्यवसाय मार्गदर्शन मोबाईल रिपेअरिंग शॉप

 



मोबाईल टेक्निशियन 

मोबाईल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. दिवसेंदिवस मोबाईलमधील फिचर बदलत आहे. भारतात मोबाईल सेवेचे वीस वर्षे पूर्ण झाली आहे. आज देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आणि मोबाईल धारक शंभर कोटी आहेत. या व्यवसायाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक भारतीय तसेच विदेशी कंपन्या कार्यरत आहेत. उत्पादन, जोडणी, वितरण, विक्री पश्चात सेवा आदींच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. यात कुशल यांत्रिक मनुष्यबळाची गरज बघता मोबाईल दुरुस्ती हे क्षेत्र युवकांना लाभदायी ठरणारे अखंड सुरु राहणारे क्षेत्र आहे. म्हणून मोबाईल दुरुस्ती हा सद्याच्या घडीला एक सर्वोत्तम व्यवसाय आहे. मोबाईल दुरुस्ती या क्षेत्रात अजून कोणताही डिग्री अभ्यासक्रम उपलब्ध नाही. डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विविध संस्थेत उपलब्ध आहेत. त्यांचा कालावधी तीन महिने, सहा महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्षाचा असतो. यात प्रात्यक्षिकांवर अधिक भर देण्यात येतो.

आज मोबाईल सर्वांना गरजेचा झाला आहे. देशातील मोबाईल धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच स्मार्ट फोनने संगणकाची जागा घेतली आहे. संगणकावर करता येणारी बरीचशी कामे आपण स्मार्ट फोनवर करू शकतो. मोबाईल क्षेत्रात नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक संधी आज उपलब्ध झाल्या आहेत. कुठलेही यंत्र असो त्यामध्ये ठराविक कालावधीनंतर त्यामध्ये बारीक सारीक तक्रारी सुरु होतात. मोबाईल फोनही याला अपवाद नाही. म्हणून आज मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण गरजेचे आहे. आजूबाजूला नजर टाकली असता आज जितक्या प्रमाणात मोबाईल धारकांच्या संख्येत वाढ होत आहे तितक्या प्रमाणात मोबाईल दुरुस्ती करणारे तंत्रज्ञ मात्र दिसत नाही. त्यामुळे मोबाईल दुरुस्ती आणि देखभाल या व्यवसायाला आजही मोठी मागणी आहे.

मोबाईलची माहिती व या यंत्रणेला समजून घेण्याची आवड असेल तर या अभ्यासक्रमात एक संधी दडलेली आहे. मोबाईल दुरुस्ती आणि देखभाल या नावाने अल्प मुदतीचे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमात टच स्क्रीन, बॅटरी देखभाल, कि-पॅड दुरुस्ती, स्पीकर, माईक दुरुस्ती, सॉफ्टवेअर तसेच गेम लोडिंग कसे करायचे हे शिकविले जाते. मोबाईल वापरत असताना भेडसावणाऱ्या समस्या जसे कि चार्जिंग, अनलॉकिंग, डिस्प्ले, बॅटरी, कि-पॅड, पॉवर ऑन-ऑफ, मोबाईलचे नादुरुस्त भाग बदलणे, दुरुस्ती करणे, असेम्ब्ली, डीअसेम्बली यांसारख्या विविध समस्यांचे प्रशिक्षण दिले जाते. मोबाईल दुकानात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत अनेकांनी हे मोबाईल दुरुस्तीचे ज्ञान आत्मसात केले आहे. थेरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानावर भर देत हे ज्ञान एकाकडून दुसऱ्याकडे जात आहे. कौशल्य असलेल्या या व्यवसायात चांगली कमाई मिळत असल्याने अनेक युवक याकडे वळत आहेत.

मोबाईल रिपेअरिंग हा कोर्स केल्यानंतर युवकांना अनेक मोबाईल कंपन्याच्या सर्विस सेंटरवर तंत्रज्ञ म्हणून नोकरीची संधी उपलब्ध आहे. यात पगार प्रतिमाह दहा ते पंचवीस हजार मिळू शकतो. युवक स्वतःचा व्यवसाय देखील करू शकतो. या व्यवसायात मोबाईल दुरुस्ती बरोबरच मोबाईलची विविध अॅसेसेरीजची देखील विक्री करता येते. स्वतःचे दुकान असल्यास या व्यवसायातून दरमहा पन्नास हजारांपर्यंत कमवू शकतो. आज गावोगावी अन गल्लोगल्ली मोबाईल रिपेअरिंगचे दुकान सुरु झालेले आपण पाहतो, असे असतांना या संधीचे सोने करायलाच हवे. या व्यवसायात उत्पन्नाचे स्त्रोत अमर्याद आहे फक्त गरज आहे ती उत्तम आणि प्रामाणिक सेवा देण्याची.

मधुकर घायदार, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक, 9623237135

https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF



https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

  10 वी+ ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात? रेल्वेत नोकरी करायची? Railway Recruitment Board, Government of India यांनी असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilots) या एकूण 5696 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी. 28 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.. Click here https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz