Skip to main content

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती विशेष...



थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर           

दिनांक 28 मे जयंती विशेष  ----        

        स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म 1883 साली भगूर येथे नाशिक जिल्ह्यात झाला.   विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी,समाजसुधारक मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ आणि भाषाशुद्धी व लिपी शुद्धी ह्या चळवळीचे प्रणेते होते. 1938 च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 'हिंदुत्व'या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांचे बालपण, शिक्षण आणि क्रांतिकार्य याची माहिती जाणून घेऊ.    

             स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्त्रोत ह्या रचना केल्या. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजतात लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरतो झुंजेन." अशी शपथ घेतली.                   

            मार्च 1901 मध्ये विनायकरावांचे यमुनाबाई यांच्याशी लग्न झाले.लग्नानंतर इ. स. 1902 साली फर्ग्यूसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. व इ.स.1906 साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.               

"राष्ट्रभक्तसमूह" ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हस्कर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. पुढे या संघटनेच्या 'मित्रमेळा' या शाखेचे "अभिनवभारत" या संघटनेत रूपांतर झाले. सावरकरांनी 1905 साली विदेशी कापडांची होळी केली. सावरकर लंडनमध्येच असतानाच त्यांनी इंडिया हाऊस मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू केले. मदनलाल दिग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलाल ने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून हसत हसत फाशी स्वीकारली. इतर देशातील क्रांतिकारकांपासून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान जाणून घेतले. हे तंत्रज्ञान व 22 ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकी एका पिस्तुलने नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या सोळा वर्षाच्या युवकाने केला.               

            1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा सादार इतिहास सावरकरांनी लिहिला. हा ग्रंथ ब्रिटिश सरकारने प्रकाशनापूर्वीच जप्त केला. या ग्रंथाची इंग्रजी व मराठी आवृत्ती अशा दोन आवृत्या होत्या. त्यातील इंग्रजी आवृत्ती इंग्रजांनी जप्त केली व मराठी आवृत्ती हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटीनो यांनी जपून ठेवली होती. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याच्या आरोपात सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश सरकारने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्यापाण्यावर धाडले. या घटनेचा बदला हा अनंत कान्हेरे या युवकाने घेतला.              

         नाशिकच्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमिन यांच्या करवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्र मार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांसच्या मॉर्सेलीस बेटाजवळ बोटीतून उडी मारली. ते पोहत पोहत फ्रांसच्या किनाऱ्याजवळ आले असता तेथील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही. आणि ब्रिटिश सैनिकांनी अटक करून त्यांना भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची काळ्यापाण्याची शिक्षा ठोठविण्यात आली. त्यांना अंदमानच्या काळ कोठडीत ठेवण्यात आले. हर प्रकारे छळले, खड्या बेडीत टांगले, तेलाच्या घाण्याला जुंपले, नारळाच्या काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यात एकच ध्येय होते मातृभूमीचे स्वातंत्र्य! तब्बक्ष्ना त्यांनी सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारत्व तसुभरही कमी होऊ दिले नाही. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिली.          अंदमान मध्ये असताना सावरकरांनी इसेन्शिअल ऑफ हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला. हिंदू संघटन करणे आवश्यक आहे. हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यगार यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रयत्नामुळे व खुद्द सावकारांनी मसुदीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने  मान्य केली. आणि ब्रिटिश सरकारची माफी मागितली. त्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.      अशा या महान थोर क्रांतिकारकाचे देशकार्य शेवटपर्यंत अविरत सुरूच राहिले.



     लेखक प्रवीण दादारावजी वासनकर

करजगाव ता. चांदुरबाजार जि. अमरावती.

मो. न. ७७७४०४७६६९


सौजन्य: राजेश चायंदे, शिक्षक ध्येय प्रतिनिधी अमरावती, 89289 50716



शैक्षणिक माहितीसाठी आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा...

https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF

https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...