मेकॅनिकल इंजिनीअर व्हायचयं...
यंत्र अभियांत्रिकी - मेकॅनिकल इंजिनीअरिंग ही अभियांत्रिकीची सर्वात जुनी व विस्तृत अशी शाखा आहे. अठराव्या शतकात सुरु झालेल्या युरोपातील औद्योगिक क्रांती नंतर खऱ्या अर्थाने या शाखेला उभारी मिळाली.
वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक व प्रत्यक्षातील ज्ञान मिळविण्याच्या व वापरण्याच्या कौशल्यांना, व्यवसायांना आणि शास्त्रांना त्याचा प्रत्यक्षात जीवनातील वापरास ‘अभियांत्रिकी’ असे म्हणतात. आपण सामान्यपणे विज्ञानाच्या प्रत्यक्षातल्या उपयोगाला अभियांत्रिकी असे म्हणतो. त्यात बांधकाम यंत्रे, उपकरणे, पदार्थ, प्रणाली व प्रक्रिया यांचे आराखडे व निर्मिती करणे हे अभियांत्रिकीची प्रमुख कार्ये आहेत.
यंत्र अभियांत्रिकीमध्ये यंत्रांची निर्मिती करणे, त्यांचे संचलन करणे व त्याद्वारे उत्पादन निर्माण करणे किंवा त्यावर प्रक्रिया करणे या गोष्टींचा समावेश होतो. त्यासाठी विज्ञानातील भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, गणित व सांख्यिकी इत्यादी शाखांतील मूलभूत तत्वांवर आधारित संकल्पनांची योग्य सांगड घातली जाते.
एखाद्या संकल्पनेतून समाजोपयोगी उत्पादन किंवा प्रक्रिया निर्मिती करणे व बाजारात त्यांचे वितरण करणे हे मेकॅनिकल इंजिनीअर - यंत्र अभियंत्याचे प्रमुख कार्य असते.
आजच्या काळात जवळपास सर्वच क्षेत्रात मेकॅनिकल इंजिनीअर - यंत्र अभियंत्यांची गरज असते. जसे की, कार, मोटारसायकल, ट्रक, बस आदी वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या, विमान व जहाज बांधणी करणाऱ्या कंपन्या, विमान बांधणी करणाऱ्या कंपन्या, वेगवेगळे खाद्य उत्पादन व प्रक्रिया उद्योग, संगणक व विदयुत उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, विदयुत निर्मिती आणि वितरण करणाऱ्या कंपन्या, रासायनिक उत्पादन क्षेत्रातील कंपन्या, बांधकाम क्षेत्रातील कंपन्या, खनिज तेल शुद्धीकरण कारखाने इत्यादी कंपन्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरची आवश्यकता असते.
मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये यंत्र व यंत्रप्रणाली चालवण्यासाठी औष्णिक व यांत्रिक ऊर्जेचा वापर करण्याच्या दृष्टीने रचना करणं व त्याचं विश्लेषण करणं या गोष्टींचा समावेश होतो. या क्षेत्रातले अभियंते सर्व प्रकारच्या यंत्राची रचना, चाचणी, निर्मिती व ती कार्यरत करण्याचं काम करतात. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे क्षेत्राची दोन प्रकारांत विभागणी होते. त्यात पहिले म्हणजे यंत्रं, यंत्रांची रचना, साहित्य, जलशक्ती व हवेची शक्ती. दुसऱ्या प्रकारात कार्य व ऊर्जा, उष्णता, वायुविजन व वातानुकूलन. यातूनच मेकॅनिकलमधील विविध उपशाखांचा उगम होतो. जसे कि ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग, प्रॉडक्शन इंजिनीअरिंग, मरिन इंजिनीअरिंग, एरोनॉटिक्स व एरोस्पेस इंजिनीअरिंग, इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग आदींचा समावेश होतो.
मेकॅनिकल इंजिनीअरला विविध क्षेत्रात नोकरीची तसेच व्यवसायाची अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने एमआयडीसी मधील विविध कंपन्या, मोटार वाहन निरीक्षक, केंद्रीय रेल्वे सेवा, केंद्रीय संरक्षण विभाग, जलसंपदा व पाणीपुरवठा विभाग, ऊर्जा निर्मिती केंद्रे, केंद्रीय संशोधन संस्था उदाहरणार्थ इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) बी.आर.सी. (भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर), केंद्रीय खाणकाम विभाग, बदलत्या काळानुसार यंत्र अभियंते, बँकिंग क्षेत्रे, वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी विविध उपकरणे व यंत्रांची देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामात देखील मेकॅनिकल इंजिनीअर आपले करिअर करू शकतात. मुख्य म्हणजे यंत्र अभियंता केंद्रीय लोकसेवा आयोग व विविध राज्यांचे लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या माध्यमांतून भारत सरकार व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांत अधिकारी पदांवर देखील कार्य करू शकतात.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, भटके विमुक्त,विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक मागास प्रवर्ग तसेच अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्याना शासनामार्फत शिष्यवृत्ती मिळू शकते. या शिवाय फी भरण्यासाठी वेगवेगळ्या बँकांकाडूनही शैक्षणिक कर्ज मिळते.
युवकांना यंत्र अभियांत्रिकी शाखेमध्ये आपले करिअर घडवू इच्छितात त्यांच्यासाठी पदविका व पदवी असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
यंत्र अभियांत्रिकी शाखा ही कालानुरूप विकसित होत जाणारी शाखा असल्यामुळे युवकांनी यात करिअर करून आपल्या देशाच्या प्रगतीत हातभार लावावा हीच अपेक्षा.
Join WhatsApp Group Today
https://chat.whatsapp.com/D1OpvQvTWlFF6N5WDEq6gF
शिक्षक ध्येय: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz