संपादकीय...
राष्ट्रपिता...
झाले बहु l आहेत बहु ll
होतील बहु l परंतु यासम हा ll
असे वर्णन ज्यांचे करता येईल ते म्हणजे भारताचे राष्ट्रपिता
महात्मा गांधीजी! जगातील सर्वात जास्त चर्चेतलं, ओळखीचं, लेखकांना-विचारवंतांना बौद्धिक खुराक पुरवणारं नाव तसेच ७० देशात असलेले
त्यांचे पुतळे १५० च्या वर जगातील देशांनी त्यांच्या स्मरणार्थ काढलेले टपाल
तिकीटं, महात्माजींच्या कार्याची थोरवी सांगताना प्रसिद्ध वैज्ञानिक आईनस्टाईन
म्हणाले होते की, ‘आणखी काही पिढ्यांनंतर लोकांचा विश्वास
बसणार नाही की असा कधी कोणी माणूस झाला होता.’
'सत्याग्रह'
हा अधिक शाश्वत आणि चिरायू असा मार्ग आहे. 'सत्य'
आणि 'अहिंसेच्या' मिलनातून
निर्माण झालेले ते अत्युच्च सामर्थ्य होय.
रविंद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना 'महात्मा'
ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने 'बापू' म्हणत आणि त्यांना भारताचे राष्ट्रपिता ही
म्हटले जाते.
गांधीजी
सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांनी आपल्या देशासाठी अनेक महान कार्य
केली. ध्येय वेडाने मनुष्य प्रेरित झाल्यावर सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्व कसे
फुलू शकते याचे हे उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी होय.
असेच देशहितासाठी देह झिजवत असताना ३० जानेवारी, १९४८ रोजी
राष्ट्रपित्याची एका माथेफिरूने हत्या केली. त्यावेळी आयरिश नाटककार जॉर्ज
बर्नार्ड शॉ म्हणाले होते ‘या जगात अतिशय चांगले असणे खरंच चांगले नाही.’
अशा महात्म्यास कोटी कोटी प्रणाम!
अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
Comments
Post a Comment