Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय: नवरात्रोत्सव विशेषांक उपलब्ध

 



नवरात्र म्हणजे स्री शक्तीची उपासना

नवरात्र म्हणजे स्री शक्तीची उपासना करण्याचे दिवस होय. जगात कोणतेही नैतिक मूल्य केवळ चांगले असल्यामुळे टिकत नाही, तर त्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्याच्या मागे संत-महंतांची तपस्या असणे आवश्यक आहे. तपश्चर्येला यश मिळते ही गोष्ट सत्याच्या उपासकांना विसरून चालणार नाही.

अश्विन महिन्यात येणार्‍या या नवरात्रोत्सवाची एक प्रसिद्ध कथा आहे. महिषासुर नावाचा एक अत्यंत क्रूर राक्षस होता. त्याने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्रिलोकात अत्याचाराचे थैमान घातले होते. त्याच्या अत्याचारामुळे सर्वजण दु:खी झाले होते. या अत्याचारापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्व देवांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची आराधना केली.

देवांची प्रार्थना ऐकून आद्यदेव महिषासुरावर अत्यंत क्रोधीत झाले आणि त्यांच्या पुण्य प्रकोपाने एक दैवी शक्ती प्रकट झाली. सर्व देवांनी त्या शक्तीचा जय-जयकार करून तिचे पूजन केले. तिला आपल्या दिव्य शस्त्रांनी सजविले. या देवीने सलग नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला. नंतर दैवी शक्तीची पुनर्स्थापना करून देवांना अभय दिले. ती दैवी शक्ती म्हणजे दुसरे कुणीही नसून आपली जगदंबा माता आहे.

नवरात्रीच्या दिवसात वाईट विचारांवर विजय मिळविला पाहिजे. महिषासुराचे मायाजाळ ओळखून त्याच्या राक्षसी कृत्यापासून मुक्त होण्यासाठी दैवी शक्तीची आराधना करणे आवश्यक आहे. संपूर्ण नऊ दिवस अखंड दीपज्योती लावून देवी जगदंबेची पूजा करून तिची शक्ती प्राप्त करण्याचे दिवस म्हणजे नवरात्र होय.

राक्षस हा मोठमोठे दात, नख, लांबलचक केस, मोठे डोळे असलेला भयानक प्राणी असतो अशी आपली कल्पना आहे. वास्तविक राक्षस म्हणजे 'असुषु रमन्तेइति असुरा:' प्राण्यांत रमणारा, सुखात राहणारा आणि महिष म्हणजे रेडा. रेड्यासारखी वृत्ती असणारा राक्षस म्हणजे महिषासुर होय. रेडा नेहमी आपले सुख पाहत असतो. समाजात आजही रेड्यासारखी प्रवृत्ती वाढताना दिसून येते. त्याचा परिणाम म्हणजे समाज स्वार्थी आणि भावनाशून्य बनला आहे. समाजात व्यक्तीवाद आणि स्वार्थीपणाची अमर्यादित वाढ झाली असून तो महिषासुराच्या रूपाने नांदत आहे. या महीषासुराला बांधून ठेवण्यासाठी देवीकडे शक्ती मागण्यासाठी नवरात्र उत्सव साजरा केला जातो.

वेदांत शक्तीच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले आहे. महाभारताचे प्रत्येक पान बलोपासना आणि शौर्यपूजेने भरलेले आहे. महाभारतात पांडवांना धार्मिक मूल्य टिकवून ठेवायचे असेल तर केवळ हात जोडून बसून चालणार नाही तर शक्तीची उपासना करावी लागेल असा सल्ला महर्षी व्यासाने दिला होता. अर्जुनाला दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठी त्यांनीच स्वर्गात जाण्याचे मार्गदर्शन केले होते.

अनंत काळापासून दैवी विचारांवर राक्षसी विचार आक्रमण करत आले आहेत. या विचारावर संकट आले तेव्हा तेव्हा देवांनी भगवंताकडे शक्ती मागून राक्षसी प्रवृत्तीचा सर्वनाश केला. केवळ चांगले विचार असून चालत नाही तर त्या विचारांचे रक्षण करणे गरजेचे असल्यामुळे शक्ती उपासना करणे आवश्यक आहे. म्हणून आपण आळस झटकून शक्तीच्या उपासनेला सुरवात केली पाहिजे. 'संघे शक्ती: कलै युगे' हे लक्षात ठेवून नवरात्रीच्या दिवसात दैवी विचारांच्या लोकांचे संघटन करणे आवश्यक आहे.

या संघटनेच्या मुख्य स्थानी जगदंबा असेल आणि तिच्या भक्तीने आपल्याला शक्ती प्राप्त होईल, हे सुचित करण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात गरबा आणि रासलीलेच्या रूपात देवी भोवताली फेर धरला जातो. देवीजवळ फिरता-फिरता आपण हे मागितले पाहिजे की, ‘हे देवी! आम्हाला सदसदवि‍वेक बुद्धी दे. आमच्या संघटनेत अहंकार, द्वेष येत आहे. त्याला तू नष्ट कर.’

देवी जगदंबेची ही उपासना नवरात्रीत सुरू होते. परंतु केवळ नऊ दिवसासाठी मर्यादीत न ठेवता कायम ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. 

अंक वाचण्यासाठी इथे क्लिक करा .....   CLICK HERE


Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...