Skip to main content

आपल्या आचरणातून संदेश...

 


आपल्या आचरणातून संदेश...

अमर्याद काळाच्या वाटेवर काही माणसे आपल्या कर्तृत्वाची पाऊले उमटवितात. काहींची ठसठसीत उमटतात तर काहींची पुसटशी. काहींची उमटल्यासारखी वाटतात तर काहींची उमटतच नाही. महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री हे असे व्यक्तिमत्व होऊन गेले की त्यांनी काळाच्या पाऊलवाटेवर आपली दमदार पावलं ठळकपणे उमटविली आहेत.

आपणास जर खरेच जीवनात आणि जगात शांतता पाहिजे असेल तर या दोन महान नेत्यांच्या विचाराशिवाय आजतरी पर्याय नाही. आपण आज सैरभैर आणि बधीर झालो आहोत. फक्त पुतळे उभे करून किंवा 2 ऑक्टोबरला यांची जयंती साजरी करून काहीच हाती लागणार नाही, तर यांच्या जयंतीनिमित्त तरी आज आपण यांच्या विचारांची कास धरली पाहिजे, ठोस कृती केली पाहिजे.

अल्बर्ट आईनस्टाईन गांधीजींबद्दल लिहितात, अशा प्रकारचा मनुष्य या पृथ्वीतलावावर वावरून गेला यावर पुढील पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन लिहितात, जगाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत जे सांगितले आणि आचरून दाखविले असे एकमेव म्हणजे महात्मा गांधी.

प्रश्न हा आहे की, आपण गांधी चरित्रातून काही शिकणार आहोत का? आणि कधी? गांधीजी नेहमी म्हणायचे, My Life is My Massage. दिसायला साध्या पण प्रचंड आंतरिक उर्जा असलेल्या गांधीजींचे आपण वारसदार आहोत हे प्रत्येकाने विसरता कामा नये.

साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच लाल बहादुर शास्त्री. ‘जय जवान, जय किसान’ हा मंत्र त्यांनी दिला. कष्टमय जीवन, सरकारी गाडीचा त्याग, भेटवस्तूस नकार, प्रसिद्धीची हाव नसणे आदी गुण यांच्याकडून शिकण्यासारखे आहेत.

दोन्ही नेत्यांनी सांगितलेली तत्वे खेड्यांचा विकास, शेतकऱ्यांचा विकास, कौशल्य आधारित शिक्षण याबाबत आपण विचार आणि प्रत्यक्ष कृती कधी करणार आहोत?...  

Visit us: https://shikshakdhyey.com/   

मधुकर घायदार, संपादक




Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात , त्यातील एक कला म्हणजे ' च

रेल्वे: ITI Diploma, Degree किंवा B.Sc. उत्तीर्ण

  रेल्वेत 9144 जागांसाठी भरती जाहीर Railway Recruitment Board यांनी टेक्निशियन 9144 जागांसाठी ITI Diploma, Degree किंवा B.Sc. उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 8 एप्रिल. 43 पानांची PDF जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. CLICK HERE.. शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी जॉईन व्हा.. https://chat.whatsapp.com/H2g2fgSLMT77f0S0Tcp84v स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

10 वी ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात?

  10 वी+ ITI, Engg. Diploma or Degree उत्तीर्ण आहात? रेल्वेत नोकरी करायची? Railway Recruitment Board, Government of India यांनी असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilots) या एकूण 5696 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी. 28 पानांची PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.. Click here https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz