Posts

Showing posts from 2020

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव!

Image
  दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव! दरवर्षी आपण सर्व मोठ्या उत्साहाने दिवाळी सण साजरा करीत असतो. पण या वर्षी थोडे नियम पाळत ह्या सणाचा आनंद आपल्याला लुटायचा आहे.           सदया शाळा बंद आहे. ऑनलाइन तसेच ऑफलाइन शिक्षण सुरू आहे. खरोखरच काही गावांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आमचे शिक्षक जीवाचे रान करतांना दिसत आहे.           फराळ , फटाके , आकाशकंदील , रांगोळी , दिवे , पणत्या , लायटिंग आदि नेहमीप्रमाणेच साजरे करीत कोरोनाचा प्रभाव लवकर कमी व्हावा अशी प्रार्थना आपण सर्व करू या... यंदा दिवाळीत आपण वाचनाचा देखील आनंद लुटू या... आपला दिवाळी उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत ... ‘ शिक्षक ध्येय ’ चा “दिवाळी अंक ”. आपल्याच अनमोल सहकार्यातून निर्माण झालेला एक दर्जेदार , वाचनीय आणि संग्रही असा दिवाळी अंक... यंदा दिवाळी अंकात मा. शिक्षण मंत्री , अपर सचिव , आयुक्त , जिल्हाधिकारी , सीईओ , संचालक यांच्या शुभ संदेश आणि मुलाखतींचा समावेश आणि दर्जेदार कथा , कविता , वात्रटिका , हास्यविनोद , व्यंगचित्रे , नवीन शैक्षणिक धोरणाचा लेखाजोखा वाचा... आमच्या

आपल्या आचरणातून संदेश...

Image
  आपल्या आचरणातून संदेश... अमर्याद काळाच्या वाटेवर काही माणसे आपल्या कर्तृत्वाची पाऊले उमटवितात. काहींची ठसठसीत उमटतात तर काहींची पुसटशी. काहींची उमटल्यासारखी वाटतात तर काहींची उमटतच नाही. महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री हे असे व्यक्तिमत्व होऊन गेले की त्यांनी काळाच्या पाऊलवाटेवर आपली दमदार पावलं ठळकपणे उमटविली आहेत. आपणास जर खरेच जीवनात आणि जगात शांतता पाहिजे असेल तर या दोन महान नेत्यांच्या विचाराशिवाय आजतरी पर्याय नाही. आपण आज सैरभैर आणि बधीर झालो आहोत. फक्त पुतळे उभे करून किंवा 2 ऑक्टोबरला यांची जयंती साजरी करून काहीच हाती लागणार नाही, तर यांच्या जयंतीनिमित्त तरी आज आपण यांच्या विचारांची कास धरली पाहिजे, ठोस कृती केली पाहिजे. अल्बर्ट आईनस्टाईन गांधीजींबद्दल लिहितात, “ अशा प्रकारचा मनुष्य या पृथ्वीतलावावर वावरून गेला यावर पुढील पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन लिहितात, “ जगाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत जे सांगितले आणि आचरून दाखविले असे एकमेव म्हणजे महात्मा गांधी. प्रश्न हा आहे की, आपण गांधी चरित्रातून काही शिकणार आहोत का? आणि कधी? गांधीजी नेहमी म्हणायचे, “

कलाशिक्षण: काळाची गरज

Image
वरील मुखपृष्ठावर क्लिक करून गुगल ड्राईव्हमध्ये उघडा  कलाशिक्षण: काळाची गरज पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव व प्रयोगातून प्रत्येक विद्यार्थी शिकत असतो. प्रयोगातून घेतलेले शिक्षण चिरकाल स्मरणात राहते तसेच यामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळून त्यांच्यातील जीवनकौशल्यांचा विकास होण्यास मदत होते. यातूनच नवीन कल्पक, उद्योजक, कलाकार घडण्यास मदत होते. विद्यार्थ्यांमधील कलागुण व सर्जनशीलतेला वाव मिळतो. प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होऊन कसे चालेल? शाळेतील कार्यानुभव, चित्रकला, हस्तकला, पर्यावरण, शारीरिक शिक्षण, स्व:विकास, व्यक्तिमत्त्व विकास हे खरे तर विद्यार्थ्यांमधील कलाकाराला साद घालणारे विषय आहेत. हे सर्व विषय व्यवस्थित शिकविले गेल्यास अनेक उद्योजक, कलाकार तयार होतील पण खरच आजकाल हे विषय शाळेत प्रभावीपणे शिकविले जातात का? शाळा ही फक्त परीक्षार्थी बनवायची इमारत नसून विद्यार्थ्यांच्या पंखामध्ये बळ देण्याचे काम ती करीत असते. आजही विद्यार्थ्यांना चित्रकला, कार्यानुभव आदी तास आवडतात पण दुर्दैव असे की एकतर या विषयांना शिक्षकच नसतात त्यामुळे या तासांना गणित, इंग्रजी, विज्ञानाचा तास घे

वाचायलाच हवे...

Image
  साप्ताहिक शिक्षक ध्येय वाचण्यासाठी वरील मुखपृष्ठावर क्लिक करावे  वाचायलाच हवे... वाचाल तर विचार बदलतील, विचार बदलले तर स्वभाव बदलेल, स्वभाव बदलला तर सवयी बदलतील, सवयी बदलल्या तर व्यक्तिमत्व बदलेल आणि व्यक्तिमत्व बदलले तर भवितव्य घडेल, म्हणून नेहमी वाचन करावे.   ~~ शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर शरीराला जशी व्यायामाची गरज असते तशी मनाला वाचनाची. आज आपण जागतिक पुस्तक दिन, वाचन प्रेरणा दिन, ग्रंथालय दिन, ग्रंथ दिंडी यासारखे अनेक उपक्रम साजरे करतो तरी यामागील मुख्य उद्देश लक्षात येत नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते. थोर इतिहासकार गिबन म्हणा ले होते, ‘देशातली सगळी संपत्ती जरी माझ्या पायाशी ओतली तरी माझे वाचनप्रेम मी सोडणार नाही.’ पुस्तकां प्रती आपली सर्वांची अशीच श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. आपल्या अवांतर   वाचनामुळे मतपरिवर्तन होऊ शकते. आज उच्च पदाची नोकरी जे करीत आहेत त्यांच्या जीवनात वाचनाचा फार मोठा वाटा आहे. हा वैचारिक, आर्थिक, सामाजिक, सकारात्मक बदल फक्त वाचनामुळे घडून येतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दररोज अवांतर वाचन केले च पाहिजे. वाचनामुळे समुपदेशनाची , सल्ल्याची गरज पडत नाही.

साप्ताहिक शिक्षक ध्येय ५ सप्टेंबर २०२० अंक २१ वा

Image
  साप्ताहिक शिक्षक ध्येय ऑनलाईन वाचण्यासाठी वरील कव्हरवर क्लिक करून गुगल ड्राईव्ह मध्ये ओपन करावे               आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस... हा दिवस ‘ शिक्षक दिन ’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन यांच्या मते “ शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकं मुलांना पढवून संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो, चांगला शिक्षक तोच असतो ज्याच्यामध ला विद्यार्थी सदैव जीवंत असतो . ”               शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो.             युनेस्को चे घोषवाक्य आहे - ‘शिक्षकांबाबत निश्चित भूमिका घ्या’ (Take a stand for Teachers!) निश्चित भूमिका म्हणजे नेमके काय करावे? तर शिक्षकांना योग्य प्रशिक्षण द्यावे, व्यावसायिक विकासाच्या संधी उपलब

शिक्षक दिन - कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार - निकाल

Image
  ५ सप्टेंबर २०२० - शिक्षक दिन - कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार - निकाल   साप्ताहिक शिक्षक ध्येय वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आजच आमच्या व्हाटसअॅप ग्रुपला जॉइन व्हा...* https://tinyurl.com/yb7kv6sp

साप्ताहिक शिक्षक ध्येय ३१ ऑगस्ट २०२० अंक २० वा

Image
  वरील कव्हर वर क्लिक करून गुगल ड्राईव्हच्या मदतीने आपण ऑनलाईन अंक वाचू शकता...  मीच माझा रक्षक भारतात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच, भारत हे कोरोना चे पुढील मुख्य केंद्र ठरू शकते, अशी चिंता वाढवणारी शक्यता वॉशिंग्टनस्थित ‘सेंटर फॉर डिसिज डायनॅमिक्स'ने व्यक्त केली आहे. 'मीच माझा रक्षक' आहे हे ध्यानात घेत आपण स्वतः स्वतःची पुरेशी काळजी घेण्याबरोबरच घरच्यांची सुद्धा काळजी घेणे आज गरजेचे आहे. सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आणि आवश्यक खबरदारी घेणे ही आज प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोना विरोधाच्या या युद्धात ‘मीच माझा रक्षक', हे आपण प्रत्येकाने मनाशी बाळगून सामाजिक भान ठेवत यावर मात करू शकतो. अमेरिकेने ६० टक्के लोकसंख्येला कोरोना ची लागण होऊ शकते हा स्वत:बाबत व्यक्त केलेला अंदाज भारतात लागू केला, तर ६० टक्के भारतीय म्हणजेच सुमारे ८० कोटी नागरिक बाधित हो तील. त्यामुळे आता उपाय एकच तो म्हणजे आपण स्वयंशिस्त लावून घेत कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडणे हे आधी प्रत्येकाने मनाशी ठरवले पाहिजे. 'जो घरात राहील तोच यापुढील काळात जगू शकेल' हे प्रत्येकाने लक्षात घ्य

साप्ताहिक 'शिक्षक ध्येय' २४ ऑगस्ट २०२० अंक १९ वा

Image
  अंक वाचण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करून गुगल ड्राईव्ह मध्ये open करून वाचनाचा आनंद घ्यावा   साप्ताहिक 'शिक्षक ध्येय' २४ ऑगस्ट २०२० अंक १९ वा “ खेलेगा भारत, तो खिलेगा भारत ” मा. नरेंद्र मोदी, पंतप्रधान आपण यंदा २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांची ११५ वी जयंती साजरी करीत आहोत. देशातील सर्व खेळाडूंना प्रेरणास्थान ठरणाऱ्या या महान हॉकीपटूचा जन्मदिवस देशात ‘क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, त्यास प्रोत्साहन मिळावे, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात सर्व प्रकारच्या खेळाविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून भारत सरकारने हा दिवस “ राष्ट्रीय क्रीडा दिवस ” साजरा करण्याचे ठरविले आहे. व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बौद्धिक तसेच शारीरिक श्रम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी तसेच आत्मविश्वास, निरोगी शरीर, एकाग्रता, कार्यकुशलता, सकारात्मकता, सहनशीलता, सहकार्य करण्याची वृत्ती, सांघिक वृत्ती, खिलाडू वृत्ती, स्पर्धात्मक वृत्ती, नेतृत्त्व आदी सर्व गुणांचा विकास करण्यासाठी ‘खेळणे’ आवश्यक आहे. आपल्याकडे एकंदरीतच खेळाला खूपच कमी महत्त

साप्ताहिक शिक्षक ध्येय १७ ऑगस्ट २०२० अंक १८ वा

Image
  अंक वाचण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करून गुगल ड्राईव्ह मध्ये open करून वाचनाचा आनंद घ्यावा   साप्ताहिक 'शिक्षक ध्येय' १७ ऑगस्ट २०२० अंक १८ वा  पालकांनो, ल ॉ कडाऊनच्या काळात तणावमुक्त राहा ...    कोरोनामुळे संपूर्ण जगभर ल ॉ कडाऊनची समस्या सुरू असताना याचा फायदा घेऊन संपूर्ण जगभर असलेल्या इंटरनेट नेटवर्कमुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा सुरू झालेली आहे. प्रायव्हेट संस्था, शिकवणी घेणारे शिक्षक आणि तंत्रस्नेही शिक्षक ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली विविध पॅकेजेस आणत असताना खेड्यात राहणारा सर्वसामान्य पालक ज्याला दोन-चार अपत्ये आहेत. तो मात्र चिंताग्रस्त आहे. दररोजच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवणे कठीण झालेल्या पालकांमध्ये उदासीनता निर्माण होत आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार वरचेवर वाढत असताना श्रीमंतांची मुले ऑनलाइन पॅकेजेसच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. परंतु सर्वसामान्य कुटुंबात मात्र मुलगा आणि वडील किंवा मुलगी आणि वडील यांच्यात एकच मोबाईल आहे. त्या ठिकाणी मात्र तारेवरची कसरत होताना दिसत आहे. वडील कामानिमित्त बाहेर पडण्याच्या वेळेस ऑनलाईन क्लास सुरू होतो आहे. परंतु पालकांनी चिंता करण