Posts

Showing posts from 2019

ब्यूटी आणि वेलनेस

Image
सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील ५२८ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण दिले जात आहे. यात प्रामुख्याने ब्युटी आणि वेलनेस, ऑटोमोबाईल सर्विस टेक्निशियन, रिटेल, हेल्थकेअर, मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स, स्पोर्ट्स, मिडिया आणि एटरटेंटमेंट, ट्रॅव्हल्स आणि टुरिझम, अॅग्रीकल्चर, बँकिंग आणि फायनान्स हे दहा अभ्यासक्रम शिकविले जातात. यात ७० गुणांचे प्रात्यक्षिक व ३० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.  आज आपण ब्युटी आणि वेलनेस अभ्यासक्रमाविषयी अधिक जाणून घेऊ या. आज महिला असो वा पुरुष दोन्हीही आपल्या सौंदर्याप्रती जागरूक झालेले आहेत. यामुळेच ब्युटी आणि वेलनेस या क्षेत्रात अनेक नवनवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत. भारतात ब्युटी आणि वेलनेस या व्यवसायात दरवर्षी वीस टक्क्यांनी वाढ होत आहे. या व्यवसायात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजही अनेक ब्युटीशियन भारतात प्रशिक्षण घेऊन विदेशात यशस्वीपणे व्यवसाय करीत आहे. भारतातील प्रशिक्षित ब्युटीशियनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.  ब्युटीशियन व्यवसायातले आधुनिक तंत्र